Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

BMC Election Results : लय मजबूत ठाकरेंचा किल्ला! भाजप-शिंदेंच्या फौजा ठाकरेंच्या 'या' बालेकिल्ल्यात घुसूही शकल्या नाहीत...

Thackeray Forts Remain Strong : मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीची सत्ता आली असली तरी देखील 'मातोश्री' परिसर, दादरचे शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क या परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून देखील त्यांना इथे विजय मिळवता आलेला नाही.

Jagdish Patil

Mumbai News, 17 Jan : साम-दाम-दंड-भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेची सत्ता आपल्या हातात घ्यायची, यासाठी भारतीय जनता पार्टी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यांच्या या मनसुब्याला यश आल्याचंही काल जाहीर झालेल्या महापालिका निकालात स्पष्ट झालं.

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीची सत्ता आली असली तरी देखील 'मातोश्री' परिसर, दादरचे शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क या परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून देखील त्यांना इथे विजय मिळवता आलेला नाही.

त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सैनिकांना ठाकरेंचा हा बालेकिल्ला अबाधित राखण्यात यश आल्याच पाहायला मिळत आहे आहे. प्रभाग क्रमांक ९३ मध्ये 'मातोश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाचा समावेश होतो. त्यामुळे हा प्रभाग ठाकरेंच्या अस्तित्व ठरणारा मानला जातो.

याच प्रभागा ९३ मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या रोहिणी कांबळे यांनी दहा हजारांहून अधिक मतांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या सुमीत वजाळे यांचा पराभव केला आहे. तर शिवसेना भवनाचा समावेश असलेल्या वॉर्ड क्रमांक १९२ मधून मनसे प्रमुख राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांना पराभूत करत ठाकरेंचा गड राखला.

तर राज ठाकरे राहत असलेल्या शिवसेना भवनाच्या लगत असलेल्या प्रभाग क्रमांक १९१ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार माजी महापौर विशाखा राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया गुरव-सरवणकर यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे मुंबईत जरी शिंदेसेना आणि भाजपची सत्ता आली असली तरी मुंबईतील ठाकरेंचे गड मात्र तसेच अबाधित राहिल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT