Rahul Narwekar  Sarkarnama
मुंबई

BMC News: विधानसभा अध्यक्षांच्या एका निर्णयाने मुंबईकरांना बसणार ५५ कोटी भुर्दंड! काय आहे प्रकरण?

Mumbai BMC Row Mumbadevi Parking: पुर्णत्वास आलेला हा प्रकल्प कोणतेही ठोस कारण नसताना थांबवल्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा या कंत्राटदाराने केला आहे. त्यांची नुकसानभरपाई देण्याची मागणी त्याने केली आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: मुंबांदेवी येथील महापालिकेचा महत्त्वाकांक्षी रोबोटिक पार्किंग टॉवर प्रकल्प सध्या वादात सापडला आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या शेवटच्या टप्प्यात असतानाच त्याला सरकारने स्थगिती दिली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाला आता मोठा धक्का बसला आहे.

या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी महापालिका आणि राज्य सरकारकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर मंदिराच्या वारसा वास्तूचे कारण देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत या कामाला स्थगिती दिली होती.

याप्रकरणी ​कंत्राटदार मे. एसएमएस लिमिटेड यांच्या वतीने वकील संदेश देशपांडे यांनी महापालिकेला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने यापूर्वीच राज्य सरकारला कळवले होते की, या प्रकल्पात कोणतीही अनियमितता नाही. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही प्रकल्प रखडल्यास खर्च वाढण्याचा इशारा दिला होता. अद्याप सरकारकडून स्पष्ट सूचना न मिळाल्याने कामावरील स्थगिती कायम असल्याचे समजते.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या प्रकल्पाला स्थगिती दिल्यानंतर आता वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण या प्रकल्पाच्या कंत्राटदाराने महापालिकेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. लवाद (आर्बिट्रेशन) कलमानुसार ५५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी त्याने महापालिकेकडे केली आहे.

पुर्णत्वास आलेला हा प्रकल्प कोणतेही ठोस कारण नसताना थांबवल्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा या कंत्राटदाराने केला आहे. त्यांची नुकसानभरपाई देण्याची मागणी त्याने केली आहे.

कंत्राटदाराचा दावा

"कोणतेही ठोस किंवा तांत्रिक कारण नसताना केवळ राजकीय दबावापोटी काम थांबवण्यात आले आहे. लवाद (आर्बिट्रेशन) कलमानुसार, काम रखडल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी पालिकेची असून आम्हाला ५५ कोटी रुपये मिळावे,"

प्रकल्प रखडल्यास त्याचा खर्च वाढेल. पालिकेने राज्य सरकारला कळवले होते की, या प्रकल्पात कोणतीही अनियमितता नाही. खुद्द मुंबादेवी मंदिर चॅरिटीजनेही स्पष्ट केले होते की, भाविकांच्या मार्गात अडथळा नसल्यास त्यांना या पार्किंग टॉवरला कोणताही विरोध नाही, असे महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी यापूर्वीच सांगितले होते.

हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांशी संबंधित असल्याने आम्ही आत्तापर्यंत याबाबतीत राज्य सरकारला दोन पत्रे लिहिली आहेत. या पत्रांना मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती गगराणी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT