Uddhav Thackeray faction corporators Sarkarnama
मुंबई

Operation Tiger Mumbai BMC : ‘ऑपरेशन टायगर’चा मुंबई महापालिकेत शिरकाव? शिवसेना ठाकरे पक्षाचे 42 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा

Political storm intensifies Mumbai BMC BJP, Eknath Shinde Shiv Sena claim several Uddhav Thackeray faction corporators are in touch amid Operation Tiger controversy : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही माजी नगरसेवक सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी महापालिकेतील सत्तासमीकरणांबाबत नवा सस्पेन्स निर्माण केला आहे.

Pradeep Pendhare

Shiv Sena Uddhav Thackeray Crisis : मुंबई महापालिकेच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून कथित ‘ऑपरेशन टायगर’ मुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही माजी नगरसेवक सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी महापालिकेतील सत्तासमीकरणांबाबत नवा सस्पेन्स निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार लढत रंगली आहे.

मुंबई महापालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षावर (Shiv Sena UBT) जोरदार निशाणा साधत मोठा दावा केला. गेल्या चार महिन्यांत विरोधी पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाने कोणत्याही महत्त्वाच्या धोरणात्मक मुद्द्यावर ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सभागृहात फक्त गोंधळ घालणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे, असे खणकर म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे सेनेच्या नेत्यांवर उपरोधिक टीकाही केली. माजी महापौरांचा (Mayor) भरणा असूनही त्यांच्याकडून प्रगल्भ चर्चा दिसत नाही. पैठणी, पुरणपोळी आणि चटणी याच विषयांवर त्यांचे अधिक लक्ष असते, असा टोला लगावत त्यांनी राजकीय वातावरण अधिक तापवले.

यापुढे आणखी मोठा दावा करत खणकर म्हणाले की, शिवसेना ठाकरे पक्षातील अनेक सदस्य आपल्या राजकीय भवितव्याबाबत साशंक आहेत. पक्षात प्रचंड घुसमट सुरू आहे. सभागृहात अनेक सदस्य नजरेतून आमच्याशी संपर्क साधतात आणि सोबत येण्याची इच्छा व्यक्त करतात. आमचा आकडा नक्की वाढणार आहे. सध्या फॉर्म्युला सांगणार नाही, पण थोडे थांबा… पुढे बघा.”

भाजपच्या या दाव्यांवर शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी तितक्याच आक्रमक शैलीत प्रत्युत्तर दिले. गणेश खणकर यांना आकड्यांचा खेळ चांगलाच जमत आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडणे आणि वरिष्ठांना खूश ठेवणे हेच त्यांना दिलेले काम दिसत आहे, असा जोरदार पलटवार त्यांनी केला.

पेडणेकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आमच्या काही नगरसेवकांशी संपर्क सुरू असल्याची आम्हाला पूर्ण माहिती आहे. पण ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जावे. आम्ही कोणालाही अडवणार नाही. एक-दोन नगरसेवक गेल्याने शिवसेना ठाकरे पक्षाला काहीही फरक पडणार नाही. आमचे निष्ठावान कार्यकर्ते आणि नगरसेवक आजही आमच्यासोबत ठाम उभे आहेत. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, फोडाफोडीचे हे राजकारण मुंबईकर जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. योग्य वेळी मतपेटीतून त्यांना याचे उत्तर मिळेल.

दरम्यान , एकनाथ शिंदे शिवसेनेचे किरण लांडगे यांनी,आणखी एक मोठा दावा करत सांगितले की, खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर आता अनेक नगरसेवकही संपर्कात आहेत. निश्चित लक्ष्य पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत प्रवेश जाहीर केला जाईल. सध्या तब्बल 30 ते 42 नगरसेवकांशी विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे, असा दावा त्यांनी केला.

मुंबई महापालिकेत खरंच ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार का? शिवसेना ठाकरे पक्षात मोठी फूट पडणार की पुन्हा एकदा राजकीय खेळी फसणार? पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT