Baba Siddique Sarkarnama
मुंबई

Baba Siddique Resigns : देवरांनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का; बाबा सिद्दीकींचा राजीनामा

Baba Siddique Resigns from Congress Party : काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिल्या पक्षाला धक्का बसला आहे.

Rajanand More

Baba Siddique Resignation Latest News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर मुंबईतील पक्षाचा मोठा चेहरा असलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनीही रामराम ठोकला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Baba Siddique News)

मागील काही दिवसांपासून सिद्दीकी पितापुत्र काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती. तसे संकेतही बाबा सिद्दीकी यांनी दिले होते. तर त्यांचे पुत्र झिशान यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. आज बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) जय्यत तयारी सुरू असताना काँग्रेसला धक्के बसू लागले आहेत.

काय म्हटले आहे बाबा सिद्दीकींनी?

बाबा सिद्दीकी यांनी ट्विटवरून राजीनाम्याची माहिती दिली आहे. मी तरूण वयातच काँग्रेस पक्षात आलो. मागील 48 वर्षाचा हा प्रवास आहे. आज मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बोलण्यासारखे खूप आहे. पण काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात. माझ्या या प्रवासातील प्रत्येकाचा आभार मानतो, असे बाबा सिद्दीकींनी म्हटले आहे. ते 10 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याचे समजते.

मुंबई काँग्रेसमधील महत्वाचे नेते म्हणून बाबा सिद्दीकी महत्वाचे नेते मानले जातात. 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले होते. झिशान सिद्दीकी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT