Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई उत्तर पूर्व मतदाससंघात भाजपचे मिहिर कोटेचा आणि ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढत दिसत असली तरी येथील खरा संघर्ष उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच होता. ठाकरेंच्या संजय दिना पाटील यांना पराभूत करण्यासाठी फडणवीसांनी सर्व चाली खेळल्या. मात्र त्यावर मात करत ठाकरेंनी कोटेचा यांच्यासह फडणवीसांना आस्मान दाखवत पाटलांचं दिल्लीचे तिकीट फिक्स केले आहे.
मुंबईतील प्रत्येक जागा जिंकून ठाकरेंना नामोहरम करण्यासाठी फडणवीसांनी प्रचंड उठाठेवी केल्या. ठाकरेंच्या निष्ठावंतांना चारीमुंड्या चित करण्यासाठी त्यांनी एकास एक उमेदवार दिले. त्यातूनच ठाकरेंच्या माजी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात मिहीर कोटेचा यांना उतरवले. त्यांना विजयी करण्यासाठी मोठी यंत्रणाही कामाला लावली. मात्र त्यांचा काही उपयोग झाला नाही, हेच या निकालातून स्पष्ट होत आहे.
पाटलांना आपण सहज गुंडाळू, अशी अटकळ बांधून फडणवीसांनी कोटेचांना प्रचंड रसद पुरवली. मात्र ठाकरेंनी गनिमी कावा करीत कोटेचांना गाठले. ठाकरेंनी कोटेचा यांना नव्हे तर फडणवीसांचाच पराभव करण्यासाठी पाटलांना सेफ केले. त्याचा परिणाम दिसून आले. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीत ठाकरेंचे शिलेदार संजय दिना पाटील आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
संजय दिना पाटील यांना अखेरच्या टप्प्यात 4 लाख 34 हजार 473 मते तर भाजपचे मिहिर कोटेचा यांना 4 लाख 10 हजार 558 मते मिळालेली आहेत. पाटलांनी फक्त 23 हजार 915 मतांनी आघाडी घेतली आहे. मात्र आता फेऱ्या संपत आल्याने पाटलांचा विजय निश्चित मानला जात आहे. या मतदारसंघातून यापूर्वी भाजप किरीट सोमय्या (2014), मनोज कोटक (2019) यांच्या विजयी झाले होते. आता भाजपला हॅटट्रीक करण्याची संधी होती. मात्र कोटेचा यांना त्यात अपयश आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.