Avinash Das
Avinash Das  
मुंबई

अमित शहा यांचा तो फोटो शेअर करणे फिल्म निर्मात्याला पडले महाग

सरकारनामा ब्युरो

Avinash Das Latest news

मुंबई: बॉलिवूड चित्रपट निर्माता अविनाश दास यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने दास यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे. अटक टाळण्यासाठी दास यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने दास यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावत अहमदाबाद सत्र न्यायालयाला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.

गुजरात पोलीस अविनाश दास यांचा शोध घेत आहे. आपली अटक टाळण्यासाठी दास यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केला होता. ट्रांजिस्ट अटकपूर्व जामिन अर्ज केला होता. दरम्यान, गेल्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा यांचा महिला आयएएस अधिकाऱ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अविनाश दास यांच्याविरोधात अहमदाबादमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. दास यांनी मंत्री अमित शहा आणि आयएएस अधिकारी पूजा सिंघल हे दोघे रांचीमध्ये २०१७ साली एका कार्यक्रमात बोलत असलेले एक छायाचित्र अलीकडेच ‘शेअर’ केले होते. लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि अमित शहा यांची प्रतिष्ठा डागाळण्यासाठी’ दास यांनी हे छायाचित्र शेअर केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

याशिवाय तिरंगा झेंडा घातलेल्या एका महिलेचे मॉर्फ केलेले छायाचित्र शेअर करून राष्ट्रीय ध्वजाचा अपमान दिग्दर्शन केलेले दास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. २००९-१० मध्ये झारखंडमधील खुंटी जिल्ह्याच्या उपायुक्त असतानाच्या कार्यकाळात पूजा सिंघल यांनी ‘मनरेगा’तील निधीचा अपहार केल्याच्या आरोपप्रकरणी ईडीने बुधवारी त्यांना अटक केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT