Pune Porsche Accident Case
Pune Porsche Accident Case Sarkarnama
मुंबई

Video Porsche Accident Case Update : मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दणका; अल्पवयीन आरोपीचा जामीन मंजूर

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai News : कल्याणीनगर अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना मोठा दणका दिला आहे. या अपघातातील सुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

आदेशानुसार त्याची सुधारगृहातून लवकरच सुटका करून त्याला त्यांच्या आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच त्याचे समुपदेशन करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पुणे पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर बाल हक्क न्याय मंडळाच्या सर्व आदेश चुकीचे ठरवत मुलाची तात्काळ सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार देशभर गाजलेल्या पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची सुटका होणार आहे.

आदेशात काय म्हटले?

सेक्शन 12 जुव्हेनाईल जस्टीस अॅक्टनुसार कुठल्याही अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीर डांबून ठेवता येत नाही. त्यानुसारच याचिका दाखल केली होती. आता उच्च न्यायालयानेही हे मान्य करून अल्पवयीन आरोपीची सुटका करण्याचे आदेश दिलेले आहेत.

आदेशात 22 मे 2024, 5 जून 2024 आणि 12 जून 2024 रोजी बालहक्क मंडळाने काढलेल्या सर्व आदेश बेकायदेशीर असल्याचे नमूद केले आहे. आता न्यायालयाने अल्पवयीन मुलाची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याचिकाकर्त्या असलेल्या आत्याच्या ताब्यात मुलाला देण्यात येवे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाने कुठलीही टिप्पणी केलेली नाही.

मद्य प्रशान करून अलिशान भरधाव कारने दोन जणांना चिरडल्यानंतर आरोपी अल्पवीयन मुलाला सुरुवातीला हलक्यात सोडून दिले होते. त्यानंतर जनतेतील रोष पाहून पुणे पोलिसांनी कडक पावले उचलून अटकसत्र सुरू केले. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवले. त्यानंतर ५ जूनच्या सुनावणीत आरोपीला 25 जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा निर्णय दिला होता. हे सर्व आदेश उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT