मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधू आणि भाजपमधील जागांचे अंतर वाढले आहे. भाजपने तब्बल 80 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना 22 जागांवर पुढे आहे. दोघांचीही मिळून 102 जागांवर आघाडी आहे. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 55 जागांवर आघाडीवर आहे. राज ठाकरे यांचा मनसे पक्ष केवळ 8 जागी आघाडी मिळवू शकला आहे. त्याचवेळी काँग्रेसही फक्त 9 जागांवर आघाडी घेतली आहे.
मुंबईत यावेळी सगळ्या वॉर्डमध्ये एकाच वेळी मतमोजणी होत नाही. प्रत्येक रिटर्निंग ऑफिसर त्याच्या अधिकारातल्या 2 वॉर्डची मतमोजणी करणार आणि ती झाली की पुढची असा पॅटर्न आहे. 23 रिटर्निंग ऑफिसर आहेत. म्हणजे एका वेळी 46 वॉर्डची मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टप्प्याला दीड ते दोन तास लागेल असा अंदाज आहे. म्हणजे पहिल्या दोन तासात 46 जागांचेच निकाल हाती येतील. त्यानंतर चार तासात 92 जागांचे निकाल घोषित होणार आहेत.
BMC Election : शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई महापालिकेमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. मुलगी दिप्ती वायकर यांचा मोठ्या मतांनी पराभव झाला आहे.
डॉन अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांचा पराभवाचा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 207 मधून त्यांचा पराभव झाला आहे.
अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी प्रभाग क्रमांक 207 मधून पिछाडीवर आहेत. योगिता गवळी यांना केवळ 1434 मतं मिळाली आहेत.
मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. 1240 मतांनी त्या विजयी झाल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांना धक्का मानला जात आहे. वैशाली शेवाळे येथून निवडणूक लढवत होत्या. वैशाली शेवाळे या राहुल शेवाळे यांच्या वहिनी आहेत.
नवी मुंबईत शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर दिसून ये आहे. प्रत्येक 26 जागांवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप आघाडीवर आहे.
दहिसर वार्ड क्रमांक २ मधून पहिल्या फेरीत भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर आघाडीवर आहेत. दहिसर वार्ड क्रमाक २ मधून ठाकरेंच्या उमेदवार धनश्री कोलगे २३१६ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
मुंबई महापालिकेत प्रभाग 182 मध्ये तिसऱ्या फेरीअखेर भाजप उमेदवार राजेश पारकर यांना २१४३ मते आणि शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य यांना ६१८४ मते असून मिलिंद वैद्य आघाडीवर आहेत.
प्रभाग क्रमांक 165 मध्ये 2 ऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नवाब मलिक यांचे बंधू, कप्तान मलिक पिछाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवार अश्रफ आझमी 4548 मतांसह आघाडीवर आहेत. कप्तान मलिक यांना दुसऱ्या फेरी अखेर 2576 मतं आहेत.
वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची सत्ता येताना दिसत असून भाजपला मोठा धक्का बसत आहे. तब्बल 85 जागांवर आघाडीवर असून 85 जागांवर बविआ आघाडीवर आहे.
प्रभाग 124 मध्ये शिवसेना उबाठा चे साकिना शेख आघाडीवर आहेत. तर, एकनाथ शिंदेंच्या ज्योती खान पिछाडीवर आहेत. साकीनाका शेख या 1270 मतांनी पुढे आहेत.
भाजप महायुती 39 जागांवर आघाडीवर, ठाकरे बंधू 25 ठिकाणी पुढे आहे. भाजपला 30 तर एकनाथ शिंदेंना 9 जागांवर आघाडीवर आहेत.
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बविआ सर्व जागांवर पुढे आहे तर भाजपला मोठा फटका बसत असल्याचे चित्र असून भाजप सर्व ठिकाणी पिछेहाटीवर आहे. मात्र, पुढे हे आकडे बदलण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर हे सुरुवातीच्या कलामध्ये पिछाडीवर आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीचे कल समोर येत असून 12 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर, ठाकरेंचे शिवसेना 10 जागांवर आघाडीवर आहे. तर, शिंदेंची शिवेसना 10 आणि मनसे 10 जागांवर आघाडीवर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.