Professor And Gangster Murder Sarkarnama
मुंबई

Professor And Gangster Murder : मुंबई रक्तरंजित! प्राध्यापकानंतर कुख्यात गुंडाचा काटा, शंकरवर 29 वार, थरकाप उडवणारा खून!

Mumbai Shocker: Professor Murdered at Malad Station, Gangster Killed in Bhandup : मुंबई हत्यासत्रानं हादरली असून, प्राध्यापकापाठोपाठ कुख्यात गुंडाची भर रस्त्यात हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai crime news : मुंबई गेल्या 24तासांत हत्येच्या सत्रामुळे हादरली आहे. मालाड इथं रेल्वे स्थानकावर प्राध्यापकाची हत्येच्या घटनेला काही वेळ होत नाहीत, तोच भांडूप इथं कुख्यात गुंडाची निर्घृणपणे हत्या झाली.

कुख्यात गुंड शंकरप्रसाद यादव ऊर्फ कल्ली याचा अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. त्याच्यावर तब्बल 29 वार केले. या हत्येच्या थराराने परिसरात एकच खळबळ उडाली असून, मुंबईत कायदा-सु्व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील (Mumbai) भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकरप्रसाद यादव ऊर्फ कल्ली या कुख्यात गुंडावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून किंवा वैयक्तिक दुश्मनीतून कल्लीवर हल्ला झाला. यात हल्लेखोरांनी २९ वार केलं. यात त्याची हत्या झाली.

कुख्यात गुंड शंकर ऊर्फ कल्ली याच्या हत्येमुळे भांडुप परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. भांडुप पोलिसांनी (Police) तात्काळ हत्येची माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध करत, पोलिसांना हल्लेखोरांविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतलं असून, हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

कुख्यात गुंडाच्या हत्येपूर्वी मालाड रेल्वे स्थानकावर एका प्राध्यापकाची किरकोळ कारणातून हत्या झाली. अलोक सिंग असे हत्या झालेले प्राध्यापकाचं नाव आहे. मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली. लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ भांडणातून एकाने प्राध्यापक अलोक सिंग यांच्यावर धारदार शस्त्र हल्ला चढवला. यात अलोक सिंग यांच्या पोटात हल्लेखोराने चाकू भोकसला. यात अलोक सिंग यांचा जागेच मृत्यू झाला.

या घटनेनंतर फरार आरोपीचा रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला अटक केली. ओमकार एकनाथ शिंदे (वय 27), असे अटक केलेल्याचे नाव असून तो मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेज परिसरात राहतो. ओमकार शिंदे याला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. सध्या आरोपी बोरिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे.

दरम्यान, हत्येच्या या दोन्ही घटनांसह इतर काही गुन्ह्यांमुळे मुंबईतील कायदा-सु्व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सर्वसामान्यांनी मुंबई गंभीर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्याची मागणी होत आहे. हत्यासारख्या गंभीर घटना सार्वजनिक ठिकाणी होत असल्याने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई पोलिसांच्या कर्तव्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT