Navi Mumbai ulwe minor sisters Prostitution Case Sarkarnama
मुंबई

Mumbai Crime News : विकृतीचा कळस! मुंबईत नसरापूरची पुनरावृत्ती 7 वर्षांच्या चिमुकलीवर शौचालयात अत्याचार; आरोपी गजाआड

Minor girl assaulted in Mumbai toilet incident : मुंबईत सात वर्षीय चिमुकलीवर शौचालयात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Rashmi Mane

मुंबईतील पायधुनी परिसरात एका 7 वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रविवारी घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

पीडित मुलगी इमारतीच्या परिसरातील शौचालयात गेली असताना तेथील सुरक्षारक्षकाने तिचा पाठलाग करून आत प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही वेळानंतर मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ती एका गोदामाच्या पोटमाळ्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. मुलीची अवस्था पाहून कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक हादरून गेले.

घडलेला प्रकार मुलीच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पायधुनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही विलंब न करता गुन्हा नोंदवून संशयित सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले. या प्रकरणात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमले. संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

जखमी मुलीला सुरुवातीला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी तिला जेजे रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT