मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभागरचना आराखडय़ाला मंजुरी मिळाली आहे. यानंतर आता मुंबईसह उपनगरातील 236 वॉर्डांच्या निवडणुका कधी जाहीर होणार, याकडे मुंबंईकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान 7 मार्च रोजी मुंबई महापालिकेची मुदत संपत असल्याने एप्रिलअखेर किंवा मेमध्ये निवडणूका जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्याचबरोबर, मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च रोजी संपत आहे.या मधल्या कालावधीसाठी नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि केंद्र व राज्य सरकारच्या कायद्यानुसार ही मुदतवाढ मिळणे जवळपास अशक्य मानले जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक नेमला जाणार हे निश्चित झाले आहे.
यापूर्वी 1978 आणि 1985मध्ये तत्कालीन केंद्र सरकारकडून मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर 1990मध्येही मुंबई महापालिकेला मुदतवाढ मिळाली होती. मात्र त्यानंतर अशी 1992 साली झालेल्या घटनादुरुस्ती करण्यात आली. यात लोकसभा व विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांनाही मुदतवाढ न देण्याचा कायदा करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारकडूनही कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदतवाढीची प्रक्रियाच खंडित झाली. त्यामुळे 7 मार्च 2022ला मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर हाच नियम लागू होणार आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 मार्चनंतरच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर केली जाईल. मुंबई महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार, त्यापुढील काळासाठी प्रशासक नेमला जाईल. निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्याच्या दुसऱया दिवसापासून प्रशासक काम पाहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.