BMC election 2026 : केंद्रात अन् राज्यात सत्ता. प्रचंड आर्थिक बळ, संघटनात्मक ताकद आणि यंत्रणेचा पूर्ण वापर करूनही मुंबईत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. २२७ पैकी तब्बल १३७ जागा लढवून भाजपला १०० चा आकडा पार करता आला नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करणार, असा आत्मविश्वास पक्षाने व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात हा दावा फोल ठरला.
मुंबई महापालिका निवडणुकीतील अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी अमित साटम यांच्यावर होती. २०१७ मध्ये भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या, या निवडणपकीत ( २०२६) केवळ ८९ जागांपर्यंत मजल मारली. म्हणजेच अवघ्या सात जागांचीच वाढ झाली.
मराठी मतांचे झालेले एकत्रीकरण हे भाजपला 100 जागा रोखण्यापासूनचे प्रमुख कारण ठरल्याचे बोलले जात आहे. स्थानिक भाजप नेते या अपयशासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जबाबदार धरत आहे. शिवसेनेला लढवलेल्या ९० पैकी केवळ २९ जागांवरच विजय मिळाला आहे.
एकहाती मुंबई जिंकल्याचे भाजप-शिवसेना युतीची स्वप्न भंगल्यामुळे शिवसेना-भाजप नेते एकमेकांच्या रणनीतीवर बोट दाखवत आहेत. परिणामी, महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत असून, मुंबईतील भाजप नेतृत्वाची दिशा आणि रणनितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. नंबर 2 चा पक्ष शिवसेना शिंदे गट ठरला. मात्र, अजित पवारांच्या पक्षाला समाधानकारक कामगिरी या निवडणुकीत करता आली नाही.
शिवसेना (उद्धव ठाकरे) - ६५
राष्ट्रवादी (शरद पवार) - ०१
राष्ट्रवादी (अजित पवार) ०३
काँग्रेस - २४
मनसे - ०६
एमआयएम - ०८
इतर पक्ष - २
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.