Metro News, Eknath Shinde on Metro project News, Eknath Shinde news, Mumbai Metro project News Sarkarnama
मुंबई

शिंदेंचा ठाकरेंना धक्का : मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा, बंदी उठवली

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात शिंदे (cm Eknath Shinde) आणि फडणवीस सरकार येताच मेट्रो 3 कारशेड आरेमध्येच (aarey metro) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत 'आरे वाचवा' या चळवळीतील सदस्यांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि आरेवासीयांनी शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागे घेतली आहे.

आरे कारशेडच्या कामासाठी आता सरकारी हालचाली सुरू झाल्या आहेत. आरेमध्ये कारशेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात निर्णय झाला होता. मात्र, यावर महाविकास आघाडीने स्थगिती आणली होती. आता ही स्थगिती मुख्यमंत्र्यांनी हटवली आहे. "सरकारने कितीही प्रयत्न करू दे, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आरेमधील नागरिकांनी घेतली होती.

गेल्या काही महिन्यांपासून आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. तांत्रिक बाब पूर्ण झाल्यामुळे आता कारशेडचं काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आरेतील कारशेडवरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवाद्यांकडून अधिक आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याची शक्यता आहे.

मेट्रो 3 कारशेड आरेमध्ये उभारण्यास शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर आरेतील कारशेड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. मात्र, आरेमध्येच कारशेड उभारण्यात यावे, अशी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT