Ujjwal Nikam, Varsha Gaikwad Sarkarnama
मुंबई

Varsha Gaikwad Win : 3 तास झुंजल्या पण वर्षा गायकवाडांनी पंजा मारलाच!

Mumbai Uttar Madhya Lok Sabha Matdar Sangh : भाजपच्या उज्ज्वल निकमांनी सुरुवातीला 53 हजार मतांचे लिड घेतले होते. ते तोडण्यासाठी वर्षा गायकवाडांना मोठी झुंज द्यावी लागली. यात त्यांनी सरशी घेत विजय खेचून आणला.

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Lok Sbaha Matdar Sangh : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर झाली. भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी सुरुवातीला 53 हजारांचे लिड घेतले होते. त्यानंतर जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी निकमांवर सरशी केली. आता गायकवाड यांनी अटीतटीच्या लढतीत निकमांचा पराभव करत विजय खेचून आणला.

भाजपने अनेक दिग्गज्जांना घरी बसवून नवख्या उमेदवारांना तिकीट दिले. यातून भाजपअंतर्गत नाराजी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांचे तिकिट कापून भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना रिंगणात उतरवले. तर काँग्रेसने धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना तिकिट देत या निवडणुकीत रंगत आणली.

वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी काँग्रेससह स्वतः उद्धव ठाकरेंनी लक्ष घातले. ठाकरे याच मतदाससंघातील मतदार असल्याने गायकवाड यांना फायदा होईल असे बोलले जात होते. मात्र भाजपनेही ठाकरेंच्या या मनसुभा हाणून पाडण्यासाठी निकम यांच्या पाठीशी जोरदार ताकद लावली. त्यामुळे गायकवाड आणि निकम यांच्यात काँटे की टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले.

उज्ज्वल निकमांनी सुरुवातीस तब्बल ५३ हजार मतांचे लिड घेतले होते. ते तोडण्यासाठी वर्षा गायकवाडांना सुमारे तीन तासांची झुंज द्यावी लागली. हे लिड तोडून गायकवाडांनी काही हजारांचे मताधिक्य घेतले आणि आपला विजय खेचून आणला. दरम्यान, या मतदारसंघात सर्वात जास्त महिलांनी प्रतिनिधित्व केले आहे. यात आता वर्षा गायकवाडांचाही समावेश झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT