IPS Sourabh Tripathi
IPS Sourabh Tripathi Sarkarnama
मुंबई

IPS त्रिपाठींची कुंडली बाहेर येणार; पोलिसांच्या पाच पथकांनी आवळला फास

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी (Ransom) वसूल प्रकरणात आरोपी असलेल्या IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी (Sourabh Tripathi) यांच्याभोवतीची फास मुंबई पोलिसांनी चांगलाच आवळला आहे. त्यांच्या शोधासाठी मुंबई गुन्हे शाखेची पाच पथके उत्तर प्रदेशात गेली असून एकाला ताब्यातही घेण्यात आलं आहे. त्यामुळे त्रिपाठींच्या यांच्यावरील आरोपांची कुंडलीच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. (Mumbai Police News)

खंडणी प्रकरणात अटकेच्या भीतीने सौरभ त्रिपाठी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. बुधवारी (२३ मार्च) या अर्जावर सुनावणी होणार आहे. याशिवाय त्रिपाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठीचा अहवाल मुंबई पोलिस आयुक्तालयातून गृहविभागात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी त्रिपाठी यांना पकडण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. (IPS Saurabh Tripathi News)

पोलिसांनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एकाला अटक केली असून त्रिपाठींच्या सूचनेनुसार त्याने पोलिस निरीक्षक ओम वंगाटेकडून हवालाद्वारे पैसे स्विकारल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून पोलिसानी दीड लाखा़ंची रोकड जप्त केली आहे. अंगाडियाकडून आरोपींनी १९ लाख रुपये उकळल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांच्या हाती धागेदोरे लागत असल्याने त्रिपाठींच्या अडचणी वाढल्या आहेत.

चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल

अंगडिया व्यवसायिकांकडून खंडणी (Ransom) वसूल प्रकरणात चार दिवसांपूर्वी त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Angadiya Commercial Ransom Case: IPS Saurabh Tripathi police case Filed) या प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील ओम वंगाटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यावसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली हेाती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. या बदलीनंतर सौरभ त्रिपाठी हे सुटीवर गेले होते. आता पोलीस त्यांच्या शोधात आहेत. त्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT