Traffic halted on Mumbai Pune Expressway due to maintenance work near Kusgaon. Commuters are advised to follow alternate routes during closure hours. Sarkarnama
मुंबई

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक तात्पुरती बंद

Mumbai Pune Expressway Traffic Update April 2026 : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गवरील कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव / कुसगाव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 22 Apr : यशवंतराव चव्हाण द्रुतगती (मुंबई-पुणे द्रुतगती) मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गवरील कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव / कुसगाव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात सर्व वाहने किवळे-देहूरोड–तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येणार आहेत.

तसेच, पुण्याकडे येणारी वाहतूक दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड-किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे व दिलेल्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे.

दरम्यान, या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाचा 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असंही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस प्रवासाचं नियोजन करताना प्रवाशांनी दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणं टाळावं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT