sanjay raut sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : आर्थर रोड कारागृहात कैदी नंबर 8959 राऊताचं चाललयं तरी काय ?

Sanjay Raut : एकाच वेळी तीन बडे राजकीय नेते एकाच कारागृहात कोठडीमध्ये असण्याची ही बहुधा देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असेल.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत (sanjay raut) सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात त्यांना अटक झाली आहे. कारागृहात राऊतांना सामान्य बराकीत न ठेवता विशेष कैद्यांसाठी असलेल्या खोलीत ठेवण्यात आले आहे. राऊतांचे कारागृहातील दिनक्रमाबाबत माहिती समोर आली आहे. (sanjay raut latest news)

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊतांना ईडीने अटक केली होती. ८ ऑगस्टला राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत हे आर्थर रोड कारागृहात आहेत. या कारागृहात माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हेदेखील न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. एकाच वेळी तीन बडे राजकीय नेते एकाच कारागृहात कोठडीमध्ये असण्याची ही बहुधा देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असेल.

राऊत या कारागृहात वेळ मिळाल्यावर ग्रंथालयात वाचन करतात, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोंडीवरील बातम्यांवर त्यांचे लक्ष असते, कारागृहात त्यांचे लेखन सुरु आहे. त्यांना लेखनासाठी वही, पेन व अन्य साहित्य पुरविण्यात आले आहे. त्यांना वेगळ्या कक्षात ठेवलं आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना घरचे जेवण आणि औषध पुरवली जात आहेत. ते खोलीत ते एकटेच आहेत. मात्र, जेवण, नाष्टा घेण्याच्या वेळी लॉकअप उघडले जाते. संजय राऊतांना विशेष कैदी म्हणून वागवले जात आहे.

बहुचर्चित प्रकरणांतील आरोपींना विशेष कैदी म्हणून गणले जाते. विशेष कैदी असल्यामुळे राऊतांनाही सामान्य बराकीऐवजी १० बाय १० आकाराच्या स्वतंत्र खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. या खोलीमध्ये पंखा, स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे.

या रूममध्ये अन्य कुणी कैदी नसल्याने एकांतातच दिवस काढावे लागतात. फक्त जेवणाच्या वेळी सर्व कच्च्या कोठडीतील कैद्यांना बराकीबाहेर येण्याची मुभा असते. सकाळी साडेदहा आणि सायंकाळी पाच वाजता कैद्यांना जेवण दिले जाते. जेवण घेण्यासाठी हे कैदी आपापल्या बराकीतून बाहेर येतात.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संजय राऊतांना 31 जुलैला मध्यरात्री अटक केली होती. न्यायालयीन सुनावणीवेळी संजय राऊत यांच्या वकिलांनाकडून यावेळी न्यायालयीन कोठडीतही संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीप्रमाणेच घरचं जेवण, औषधं घेण्याची परवानगी आणि हवेशीर खोली दिली जावी अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT