young woman highlighting the rising issue of workplace harassment in Mumbai and growing concern over women safety. Sarkarnama
मुंबई

Mumbai Harassment Case : "आजकाल हिंदू मुलींना मुस्लिम..."; कंपनीतील तरूणीकडे अश्लील फोटोंची मागणी करत थेट लॉजवर..., मुंबईतील धक्कादायक प्रकार उघडकीस

Corporate Crime Against Women : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषणाचं आणि सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरणं ताजं असतानाच आता मुंबईतील आणखी एका कंपनीतील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 24 Apr : राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक आहे की नाही? असा प्रश्न पडावा इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचं लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत.

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषणाचं आणि सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरणं ताजं असतानाच आता मुंबईतील आणखी एका कंपनीतील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला काही महिन्यांपूर्वी तिच्याबरोबर काम करणाऱ्या तरुणाने अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याची तक्रार पीडितेने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनंतर अश्रफ नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अश्रफने पीडित तरुणीला तिचे फोटो मागतले आणि तिला लॉजवर जाऊन शारीरिक संबंध करण्याची मागणी फोनवरून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय या अश्रफने पीडितेच्या मैत्रिणींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

तर तक्रारदार तरुणी हिंदू असल्याचं आरोपीला मैत्रिणीने सांगताच 'आज कल हिंदू लडकी को मुस्लिम पसंद है' असं त्याने म्हटल्याचा उल्लेखही तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. याच सर्व प्रकरणी आता आरोपी अश्रफ विरोधात आग्रीपाडा पोलिसांनी लैंगिक अत्याचार, पाठलाग करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडित तरुणी फेब्रुवारी महिन्यात बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत टेलीकॉलर म्हणून काम करत होती. या कंपनीच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमधून आरोपीने तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला. त्यांनतर तो तिला सतत फोन करू लागला. यावेळी तरुणीने अतिशय हुशारीने दुसऱ्या एकाचा मोबाईल घेऊन आरोपीचा कॉल रेकॉर्ड केल्यामुळे त्याचा हा कारनामा सर्वांसमोर उघड झाला.

शिवाय फोनवर बोलताना आरोपीने इतर मुलींचे फोटो पाठवून त्यांच्याशी शारीरिक संबंध केल्याचंही सांगितलं होतं. आता प्रकरणी पीडीतीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यावेळी आरोपीने इतर तरुणींना देखील अशाच प्रकारचे कॉल केल्याची माहिती समोर आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नाशिकनंतर आता मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT