Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Sarkarnama
मुंबई

Satyajeet Tambe : '' माझ्या कुटुंबानं काँग्रेससाठी १०० वर्षे दिली, मात्र त्याच पक्षानं..''; तांबेंची खदखद

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics: माझ्यावर काँग्रेसने अन्याय का केला? याचं उत्तर पक्षातले वरिष्ठ नेतेच देऊ शकतील माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही. मात्र नाशिक पदवीधर निवडणुकीत जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. तसेच माझ्या कुटुंबानं काँग्रेस पक्षासाठी १०० वर्षे दिली. मात्र, त्याच पक्षाने मला स्पष्टीकरणाची एकही संधी न देता हाकललं अशी खदखद सत्यजीत तांबे यांनी बोलून दाखवली.

सत्यजीत तांबे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. तांबे म्हणाले, त्यावेळी निवडणुकीत जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. मला अपेक्षा होती की, काँग्रेसकडून मला तिकीट मिळेल. पण तसं घडलं नाही, त्यामुळे मी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि मी जिंकूनही आलो. पण आत्तापर्यंत काँग्रेस पक्षानं मला बोलण्याची, स्पष्टीकरण देण्याची संधी दिली नाही. हे सगळं का घडलं तुम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांना विचारा असं का घडलं? असंही सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी म्हटलं आहे.

तांबे म्हणाले, आमच्या कुटुंबात दुही माजली आहे अशाकाही बातम्याही पसरवल्या गेल्या. खास करून बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) नाराज आहेत. ते वेगळा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत असंही बोललं गेलं. मात्र,आम्ही कालही एकसंध होतो आणि आजही आहोत. बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने ते आराम करत होते. परंतू, त्या परिस्थितीतही काही चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या असंही तांबेही म्हणाले आहेत.

आत्तापर्यंत अनेक प्रसंग महाराष्ट्रात काँग्रेस(Congress)मध्ये घडलं आहे. कुणाचंही निलंबन झालेलं नाही. मात्र माझ्याशी एक शब्दाचाही संवाद न साधता थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मी सध्या तरी अपक्ष आमदार आहे असंही तांबे यांनी म्हटलं आहे.

माझं नावच काँग्रेसचा उमेदवार म्हणून येणार होतं. शेवटच्या क्षणी ते जाहीर करायचं हे ठरलं होतं. बाळासाहेब थोरात यांनाही याची कल्पना होती. मात्र अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी माझ्या वडिलांचं नाव दिल्लीतून जाहीर झालं. माझ्याशी बोलणं झालं होतं त्याप्रमाणे एच. के. पाटील यांनी माझं नाव असावं यासाठी खूप चर्चा केल्या, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र काहीही झालं नाही. पुढे एबी फॉर्मही चुकीचा आला त्यानंतर काय घडलं ते माहीतच आहे असंही सत्यजीत तांबे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT