Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Nagaland : आमचा पाठिंबा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना, भाजपला नाही : पवारांनी टाकली गुगली!

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : नागालँड विधानसभेचा निकाल लागल्यावर आता तेथील सत्तास्थापनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँडमध्ये सरकारला पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. ऱाष्ट््वादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार नागालँडमध्ये निवडून आले आहेत. आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागालँडमध्ये स्थापन होणाऱ्या सरकारातील मुख्यमंत्र्यांना आमचा पाठींबा आहे, मात्र भाजप सरकारला नाही, असे पवारांनी जाहीर केले.

नागालँडमध्ये आमचा पाठिंबा तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आहे, भाजप सरकारला नाही. नागालँडमध्ये भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत. तर नँशनल डेमाँक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीला २५ जागा मिळाल्या होत्या. दोघे मिळून सरकार स्थापन करणार आहेत. नँशनल डेमाँक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यातच आता राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला नाही तरी सरकार स्थापन होऊ शकते. मात्र ऱाष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या सात जागा निवडून आलेल्या आहेत. आपले आमदार हे मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील, भाजपला नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.ns

नागालँडमधील पक्षीय बलाबल :

*नँशनल डेमाँक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी : 25

*भाजप : 12

* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी : 7

*नागा पीपल पार्टी : 5

*अपक्ष : 4

*रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया - 2

*लोक जनशक्ती पार्टी - 2

*नागा पीपल फ्रंट - 2

*जनता दल युनायटेड - 1

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT