Najeem Mulla Sarkarnama
मुंबई

Najeem Mulla : कळवा-मुंब्रातून विधानसभा लढवण्याचे अजित पवार गटाच्या नजीम मुल्लांचे संकेत, म्हणाले...

Assembly Election : निवडणूक लढवण्याअगोदर आमदारकीचा केकही कापला; विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाडांवर केले आहेत आरोप

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर

Kalwa-Mumbra Constituency : लोकसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू आहे, तर इच्छुकांची उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. असे असताना आता लोकसभा निवडणुकीनंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीही काहीजणांनी आतापासून तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी कळवा-मुंब्रा या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

विद्यमान आमदाराने कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र भकास ठेवलेला आहे. पाण्याचा बिकट प्रश्न, वीजेचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न आदी महत्वाचे प्रश्न अजुनही बिकट आहेत. येथे फक्त टक्केवारीचे, भ्रष्टाचाराचे राजकारण व धार्मिक सलोखा बिघडविण्याचे काम गेल्या तीन टर्म मध्ये झाले आहे. असा आरोप अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केला आहे.

राष्ट्रवादी(NCP) काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिली, पक्षाने आदेश दिला आणि उमेदवारी दिली तर लोकांच्या आग्रहाखातर कळवा-मुंब्रा विधानसभेच्या विकासासाठी निवडणूक लढविणार असल्याचे संकेत मुल्ला यांनी कळवा नाक्यावरील सभेत शनिवारी रात्री बोलताना दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या अगोदर मुल्ला यांनी पक्ष कार्यालयात आमदार कळवा-मुंब्रा विधानसभा असे लिहिलेला केक कटिंग केला. त्यानंतर मुल्ला यांनी सभेत जाहीर संकेत दिल्याने लोकसभा निवडणूकपूर्वीच विधानसभा निवडणुकीची चर्चा आता जोरदार रंगताना दिसत आहे.

मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मुंब्रा-कळव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुंब्रा येथील आत्माराम चौक येथून निघालेल्या विशाल रॅलीत 500 बाईक, 100 पेक्षा जास्त फोर व्हिलर आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीची सुरुवात मुंब्रा रेतीबंदर येथून झाली आणि कळवा पूर्व येथे समारोप करण्यात आला. ही संपूर्ण रॅली, ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिशबाजीत, मुल्ला व अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या घोषणा देत पुढे सरकत होती.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, रीटा यादव, वहिदा खान, अंकिता शिंदे, राजन किणे, अनिता किणे, उमेश पाटील, गणेश कांबळे, महिला अध्यक्ष वनिताताई गोतपागर, युवक अध्यक्ष विरु वाघमारे आदी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT