Sudhir Mungantiwar, Nana Patekar News  Sarkarnama
मुंबई

Sudhir Mungantiwar News : पाटेकरांनी वाघनखांवरून मुनगंटीवारांचा काढला 'कोथळा'; मुनगंटीवार म्हणतात, 'नानांनी माझं कौतुक केलं...

Chhatrapati Shivaji Maharajs News : आपल्या खास शैलीत भाजप व मुनगंटीवार यांना नाना पाटेकरांनी चिमटा काढला.

Mangesh Mahale

Mumbai : ऐतिहासिक ठेवा असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महिनाअखेर लंडनला जाणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी याबाबत ट्विट करीत आपल्या खास शैलीत भाजप व मुनगंटीवार यांना चिमटा काढला आहे. त्यांच्या ट्विटवर नेटकरी चर्चा करीत आहेत.

"मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणताय, त्याबद्दल अभिनंदन. जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा," असा टोला पाटेकरांनी ट्विट करीत मुनगंटीवारांना लगावला आहे. त्यावर मुनगंटीवारांनी खुलासा केला आहे.

"नाना पाटेकरांनी ट्विट करण्यापूर्वी मला फोन केला होता. त्यांनी माझे अभिनंदन केले. ते म्हणाले, "मला आनंद होत आहे. तुझं किती कौतुक करावं..." नाना पाटेकरांची एक भाषाशैली आहे. ते म्हणाले, वाघनखे येतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवर सरकारनं काम करावं," असे त्यांनी मला सांगितले. "मोदी ईडीच्या माध्यमातून चौकशी करीत आहेत, त्याचाच हा एक भाग आहे," असे मी त्यांना सांगितले.

पाटेकरांनी टीका नव्हे तर माझे अभिनंदन केल्याची पुष्टी त्यांनी केली. पाटेकरांना अपेक्षित असलेले भ्रष्टाचार निर्मूलन पंतप्रधान मोदी ED च्या माध्यमातून करीत असल्याचे मुनगंटीवारांनी नमूद केले. ते माध्यमांशी बोलत होते.

ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध केला होता. ही वाघनखे सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या संग्रहालयात आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखे परत करण्याबाबत ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी होकार कळवला आहे. मात्र, त्यासाठी एक करार करावा लागणार आहे. त्यासाठीच सुधीर मुनगंटीवार लंडनला जाणार आहेत. या करारानंतर ही वाघनखे या वर्षअखेर भारतात परत येण्याची शक्यता आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT