Nana Patole, Devendra Fadnavis
Nana Patole, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

Nana Patole : छत्रपती शिवरायांचा अपमान करणं भाजपाचं नियोजित षडयंत्र! पटोलेंचा घणाघात

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजपासह शिंदे गटातील नेतेमंडळींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये करण्याची चढाओढच लागलेली आहे. हे प्रकार अनवाधानाने झालेले नसून भाजपाकडून शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचं जाणीवपूर्वक रचलेलं षडयंत्र आहे असा हल्लाबोल असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले, महापुरुषांचा अपमान करणे, त्यांची बदनामी करणे यात भारतीय जनता पक्षाला काहीच वाटत नाही. राजरोसपणे अशी अपमान करणारी वक्तव्यं होत असताना या विधानांचा तीव्र शब्दात निषेध करून कारवाई करणं अपेक्षित होतं. पण भारतीय जनता पक्षानं तसं काहीही केलं नाही. उलट सारवासारव करण्यात आली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केला. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. यामध्ये एक समान धागा असून हे सर्वजण भाजपाचेच असून हा नीतिमत्ता नसलेला पक्ष झाला आहे. महापुरुषांचा अवमान करण्याचे धाडस हे सत्तेची गुर्मी चढल्याने असून महाराष्ट्राची जनता आपल्या दैवताचा अपमान कदापि सहन करणार नाही व या बेताल लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT