प्राची कुलकर्णी
Nana Patole News : पहाटेच्या शपथविधी बाबत काँग्रेसला काहीच कल्पना नव्हती, असं स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे. साम' टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पटोले यांनी पुण्यातील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बदनाम करण्यासाठीच फडणवीस यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. मात्र या कूटनीतीच्या राजकारणात आपल्याला पडायचे नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार काय बोलले याला आता महत्त्व नाही, कारण या घटनेला आता साडेतीन वर्षे झाली. ती पहाट महाराष्ट्राची जनताच काय देशाची जनताही विसरु शकत नाहीत. राज्यपाल जाता जाता काय बोलताते तो भाग वेगळाच आहे. सरकार ही दिवसाच्या प्रकाशात जनतेच्या साक्षीने सरकार स्थापन होत असते. अंधारात सरकार स्थापन होणे, लोक झोपलेले असताना भाजपने पाठवलेल्या राज्यपाल भगतसिंहग कोश्यारी यांनी केला. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी शरद पवारांशी झालेल्या चर्चेनंतरच झाला होता, असा गौप्यस्फोट केला होता. तसेच अजित पवारांनी याबाबत बोलावं त्यानंतर मी पुन्हा याबाबत बोलेल, असंही ते म्हणाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती.
यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी असत्याचा आधार घेतल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता पुन्हा पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांनी मोठे विधान केलं होतं.
''या विषयावर अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? तसं झालं नसतं तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?'', असे विधान शरद पवारांनी केले. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीची प्रचंड चर्चा रंगली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.