Ashok Chavan, Nana Patole Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan : 'कोण कशासाठी कुठे गेले...'; नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर निशाणा

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी पक्ष आणि आमदारकीचा अचानकच राजीनामा दिला. यानंतर ते १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशोक चव्हाणांसोबत तब्बल १७ आमदार असल्याची माहिती आहे. यामुळे चव्हाणांच्या जाण्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) कोण, कशासाठी कुठे जात आहे, हे माहिती असल्याचे सूचक विधान करत नाव न घेता चव्हाणांना लक्ष्य केले.

लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा आणण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रात मिशन ४५ ची तयारी जोरात सुरू झालेली आहे. मात्र, हा आकडा गाठणे शक्य नसल्यानेच भाजप एकापाठोपाठ एक पक्ष फोडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवल्याचे दिसत आहे. मलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यानंतर काँग्रेसचे बडे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनीही आमदारकीसह काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर ते भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी नाव न घेता अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई लढत आहे. या स्थितीत सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत, हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकूमशाही वृत्तीच्या भाजपविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढू, अशा निर्धारही पटोलेंनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, खुद्द अशोक चव्हाणांनी ट्विट करत त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेस पक्षात भूकंप झाला आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने दिल्ली गाठली. यानंतर त्यांनी ट्विट करून अशोक चव्हाणांच्या काँग्रेस (Congress) सोडण्यावर सूचक विधान करून भाजपवर घणाघात केला. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT