Uddhav Thackeray-Prakash Ambedkar-Nana patole
Uddhav Thackeray-Prakash Ambedkar-Nana patole Sarkarnama
मुंबई

ShivSena-VBA Alliance : मागील काळात आम्हाला वाईट अनुभव आलाय... शिवसेना-वंचित युतीवर काँग्रेसचे भाष्य

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) युतीचे काँग्रेस पक्ष (Congress) म्हणून आम्ही स्वागत करतो. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर त्याला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही. त्याचे आम्ही स्वागतच करतो. आम्ही सर्वांना एकत्र आणण्याचे काम करत आहेात. मात्र, मागच्या काळात आम्हाला वाईट अनुभव आले आहेत. त्यामुळे आघाडीबाबत स्पष्टता असेल तरच आम्ही पुढे जाणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. (Nana Patole's Comment on Shiv Sena-Vanchit Bahujan Aghadi alliance)

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या घोषणेनंतर नाना पटोले बोलत होते. ते म्हणाले की, महाविकास आघाडीबाबतही प्रस्ताव आल्याचे आम्ही माध्यमातून ऐकले आहे. प्रकाश आंबेडकर यांचा नेमका प्रस्ताव काय आहे, तो अजून आमच्यापर्यंत आलेला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव नेमका आहे, शिवसेनेला आंबेडकरांनी काय प्रस्ताव दिला आहे, याबाबत आम्हाला अजून काहीही माहिती नाही.

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीबाबत आमची भूमिका सकारात्मक आहे. भाजप हा देशातील संविधानिक व्यवस्था संपवणारा पक्ष आहे, त्यामुळे भाजपला रोखणे हे आमचे काम आहे. त्यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आहोत. पण, मागील काळातील काही अनुभव वाईट आहेत, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पित आहोत. दोस्तीचा हात पुढे केला तर हातचं राखून नाही तर संपूर्णपणे करायचा, अशी आमची भूमिका आहे, असेही पटोले यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याशी माझी आज चर्चा झाली आहे. त्यावेळी त्यांना विचारलं की प्रकाश आंबेडकर यांचा नेमका प्रस्ताव काय आहे, हे तुम्ही आम्हाला सांगा, त्यानंतर आपण आघाडीबाबत पुढे जाऊ. याबाबत चर्चा झाली. मात्र, आंबेडकर यांचा प्रस्ताव नेमका आहे, तो अजून आमच्यापर्यंत आलेला नाही. मैत्री करायची असेल तर स्पष्टता, तसेच सर्व माहिती असायला हवी.

मित्रपक्षाच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना-वंचित बहुजन आघाडीचा फायदा भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी होऊ शकतो. आमचे नेते राहुल गांधी तेच काम करत आहेत. आम्ही सर्वांना एकत्र आणण्याचे काम करत आहेात. मात्र, मागच्या काळात आम्हाला वाईट अनुभव आले आहेत. त्यामुळे आघाडीबाबत स्पष्टता असेल तरच आम्ही पुढे जाणार आहोत, असेही पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT