Narsayya Adam Mastar
Narsayya Adam Mastar  
मुंबई

आम्ही मोदींना वाकवलं, तुम्हाला वाकवायला जास्त वेळ लागणार नाही

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एसटीच्या संपात (ST Strike) कामगारांवर दडपशाही होत आहे, ही दडपशाही सुरुच राहिल्यास महाराष्ट्र बंद करावा लागेल, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (Marxist Communist Party) नेते नरसय्या आडम (Narsayya Adam) मास्तर यांनी दिला आहे. एसटी संपाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना भरगोस पगारवाढही दिली. यानंतर काही भागात एसटी बस (ST Bus) सुरु झाल्याचं दिसत आहे.

परंतू राज्यातील अनेक ठिकाणी एसटी कर्मचारी एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून संपावर आहेत. यानंतर राज्यसरकारने कारवाईचा बडगा उगारत अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन केले तर अनेक कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. यावरुन आडम मास्तरांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना इशारा दिला आहे. आझाद मैदानात आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत आणि योगेंद्र यादवही उपस्थित होते.

दरम्यान, आडम मास्तर यांनी 9 नोव्हेंबरला सोलापूर एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेत त्यांच्या संपाला सक्रीय पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्र बंदचा इशारा दिला होता. भारतातील मार्क्‍सवादी व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचा (सिटू) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या एसटी आंदोलनात यापुढे सक्रीय सहभाग घेण्यात येईल आणि प्रश्न निकाली न लागल्यास हजारो कामगार या आंदोनलान सहभागी होतील, असे आडम मास्तकांनी म्हटले होते.

तर, भरगोस पगारवाढ देऊनही संप चालू राहणार असेल तर, सतत आर्थिक भार सोसूनही कर्मचारी एसटी बंद ठेवणार असतील तर सरकारला विचार करावाच लागेल. पैसे देऊनही संप चालू ठेवणार असाल तर, पैसे न दिलेले काय वाईट आहे. असे अनिल परब यांनी म्हंटल होतं. तसेच कर्मचाऱ्यांनी संप मिटवला तर त्यांच्या छोट्या मागण्यांचीह नक्की विचार केला जाईल, असं आश्वासन अनिल परब यांनी त्यावेळी दिलं होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT