सातारा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज साताऱ्यात शिवसैनिकांनी मोर्चा काढून नारायण राणेंच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नारायण राणे कोंबडी चोर.., या राणेच करायचे काय..खाली मुंडी वर पाय.., नारायण राणेचा निषेध असो...अशा घोषणाबाजी केली. यावेळी सातारा शहर पोलिस ठाण्यात नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Narayan Rane is a chicken thief ... Shivsainiks morcha in Satara
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटले असून साताऱ्यातही संतप्त शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री राणे यांच्या निषेधाच्या घोषणा देत शहरातील मोती चौक ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
तसेच पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन सातारा शहर पोलिस ठाण्यात नारायण राणेंच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, तालुका प्रमुख आशिष ननावरे, अनिल गुजर, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, निलेश कोरे, शिवाजीराव इंगवले, सयाजी शिंदे, नितीन लोकरे, रमेश बोराटे, आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणेंना तातडीने अटक करावी, अशी मागणी ही यावेळी शिवसैनिकांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.