<div class="paragraphs"><p>Narayan Rane- Ajit Pawar&nbsp;</p></div>

Narayan Rane- Ajit Pawar 

 
मुंबई

नारायण राणे संतापले म्हणाले, 'कोण अजित पवार, मी नाही ओळखत!'

सरकारनामा ब्युरो

मुंंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) संतोष परब हल्ला प्रकरणात कायद्याच्या कचाट्याच अडकले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी दाखल केलेले अटकपूर्वी जामीनाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच ते गायब झाले आहेत. नितेश राणे यांचा शोध सुरु असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेत नितेश राणेंवरील आरोपांवर भाष्य केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- मी नाही ओळखत अजित पवारांना

पत्रकारांनी नारायण राणेंना, नितेश राणेंनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून म्याव म्याव आवाज काढल्याचा सवाल करताच त्यांना संताप आला, कोण अजित पवार, मी नाही ओळखत त्यांना,' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखत नसल्याचे विधान केले आहे. इतकेच नव्हे तर ज्यांच्यावर करोडो रुपयांचा घोटाळा आहे, त्यांचा काय रेफरन्स देताय, असा सवालही त्यांनी केला आहे.

- नितेश राणे कुठे हे सांगायला मी मुर्ख वाटतो का

तर नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल त्यांना विचारण्यात आला तेव्हाही त्यांनी, नितेश राणे कुठे हे सांगायला मी तुम्हाला मुर्ख वाटतो का, आणि नितेश राणे कुठे आहेत, हे मला माहिती असले तरी ते मी तुम्हाला सांगणार नाही. ज्यांनी त्यांना खोट्या केसमध्ये गोवले त्यांनाच जाऊन विचारा ना, असा काय गुन्हा केला होता त्यांनी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

-शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग

शिवसेनेकडून सत्तेचा, प्रशासनाचा दुरुपयोग होत आहे. जिल्हा बॅंकेतील पाप लपवण्यासाठी शिवसेनेकडून हे सर्व सुरु आहे, निवडणूकीत नितेश राणेंचा सहभाग घेण्यास कमी करण्यासाठी असे कट रचत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसेच, एवढा असा कोणता गुन्हा केला नितेश राणेंनी की त्यांना पकडण्यासाठी कणकवलीत एवढा मोठा पोलिस फौजफाटा कशासाठी तैनात करण्यात आला आहे. तसेच, राज्यात सरकार आहे का, राज्याला मुख्यमंत्री तरी आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहेत

- भास्कर जाधवांच्या नकलेला उत्तर

नितेश राणे यांनी यांच्या म्याव म्याव आवाजाच्या मुद्द्यालाही त्यांनी समर्थन दिलं आहे. हिवाळी अधिवेशनात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नक्कल केली. मग नितेश राणेंनी म्याव म्यान केलं तर त्यात वावगं काय केलं. त्याचा आदित्य ठाकरे यांच्याशी काय संबंध, आमच्यासमोर आवाज असा सवालही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT