Disha Salian Case News, Nitesh Rane News, Narayan Rane News sarkarnama
मुंबई

राणे पिता-पुत्राला अर्टी-शर्तीसह जामीन मंजूर ; म्हणाले, 'दिशाला न्याय देणार'

कुणावर अन्याय होत असेल तर आम्ही आवाज उठविणार, दिशाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असे नितेश राणे म्हणाले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian)हिची बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राणेंनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी दिंडोशी न्यायालयात अर्ज केला होता. आज दिंडोशी न्यायालयाने काही अर्टी-शर्तीसह राणे पिता-पुत्राचा जामीन मंजूर केला आहे. (Disha Salian Case News Updates)

''महाविकास आघाडीने आमच्या विरोधात दबाब आणण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्हाला अडकविण्याचे महाविकास आघाडीचे हे षडयंत्र आहे. न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कुणावर अन्याय होत असेल तर आवाज उठविण्याचा हक्क न्यायालयाने अबाधित ठेवला आहे. जिथे अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही आवाज उठविणार, दिशाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार,'' असे न्यायालयाने दिलेल्या जामिनानंतर नितेश राणे म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

एका पत्रकार परिषदेचे नारायण राणे यांनी दिशा सालियन हिच्याबाबत बदनामीकरक विधान केले होते. यावेळी आमदार नितेश राणे हेही उपस्थित होते. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या पालकांनीही आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर त्यावर राजकारण केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती.

मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या तक्रारीवरून हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे .

''दिशा सालियनवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. त्या वेळी एका मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक तेथे उपस्थित होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. नारायण राणे व नितेश राणे हे दिशा सालियनसोबत मृत्यूपूर्वी झालेल्या बलात्काराबाबत विधान केले आहे. दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करण्यासाठीही याचिका केली आहे.

दिशाच्या मृत्यूबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा राणे पिता-पुत्र करत असले तरी तो सुपूर्द करण्यास त्यांनी नकार दिला आहे. दिशाच्या मृत्यूचा तपास सुरू असतानाही त्याबाबतचा पुरावा दोघांनी कोणत्याही तपास यंत्रणेकडे सुपूर्द केलेला नाही. त्यामुळे हा पुरावा काय आहे हे शोधण्यासाठी त्यांची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी राणे पितापुत्राच्या अटकपूर्व जामिनाला प्रतिज्ञापत्रा्द्वारे विरोध करताना म्हटले आहे. दिशाच्या मृत्युचे राणे पितापुत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत. त्यामुळे ते कशाच्या आधारे आरोप करत आहेत. तसेच पुराव्यांविना ते दिशाची बदनामी करत असतील तर त्यामागील हेतू शोधणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT