मुंबई : मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे (Rashmi Thackeray) बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ताब्यातील सदनिका अंमलबजावणी संचालनालायने (ED) ताब्यात घेतल्यानंतर त्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. त्यातून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा सामना आणखी कठोर होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. अशातच ईडीच्या या कारवाईनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘आगे आगे देखो होता है क्या’ असं म्हणत थेट इशारा दिला आहे. (Narayan Rane on Uddhav thackeray News)
नारायण राणे यांनी ट्विट करत ‘आगे आगे देखिए होता है क्या! महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या! आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच!’ मुख्यमंत्र्यांना इशारा देत टीकास्त्रही डागले आहे.
तर दूसरीकडे नितेश राणे यांनीही एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जावयावर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानंतर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींना राजीनामा द्यायला सांगितले होते. आता विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानंतर हाच नियम इथेही लागू होणार का? की इथे शिवसैनिकांसाठी वेगवेगळे नियम आहेत, असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.