Suresh Dwadashiwar, Narendra Chapalgaonkar
Suresh Dwadashiwar, Narendra Chapalgaonkar  sarkarnama
मुंबई

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : द्वादशीवार अध्यक्ष नको म्हणून मंत्रालयातून खरंच फोन आला ?

सरकारनामा ब्युरो

Narendra Chapalgaonkar : वर्धा येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची मंगळवारी निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. (akhil bharatiya marathi sahitya sammelan latest news)

ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या नावाचीही अध्यक्षपदाच्या नावाचीही चर्चा होती. द्वादशीवारांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता साहित्यवर्तुळात व्यक्त केली जात होती. अध्यक्षपदासाठी द्वादशीवार यांचे नाव का मागे पडले, याबाबत सध्या साहित्यिक वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 'द्वादशीवार अध्यक्ष नको म्हणून मंत्रालयातून फोन आला, अन् त्यांचे नाव मागे पडले, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

द्वादशीवारांच्या नावाला महामंडळाच्या इतर घटक संस्थांचेही समर्थन असल्याचे बोलले जात होते. विदर्भ साहित्य संघाकडून जेष्ठ लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवारांचे नाव पुढे करण्यात आले होते. बैठकीत द्वादशीवारांची अध्यक्षपदी निवड होणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण नरेंद्र चपळगावकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. चपळगावकर यांच्याशिवाय दुसरे नाव चर्चेला आले नाही.

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वावलंबी विद्यालयाचे प्रांगण, वर्धा येथे होईल. विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे. संमेलनाचे उद्घाटन ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. त्यापूर्वी महामंडळाचे ध्वजवंदन करण्यात येईल. संमेलनात मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT