Vikas Mahant, Balasaheb Thorat Sarkarnama
मुंबई

Narendra Modi In VidhanBhavan: विधानभवनात अचानक अवतरले 'मोदी'; बाळासाहेब थोरातांनीही 'टायमिंग' साधलं...

Maharashtra BJP vs Congress : पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अधिवेशन दोन दिवस बंद ?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : विधानभवनात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखी दिसणारी व्यक्ती अवतरली. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांची भेट घेतली. यावेळी थोरातांनी मश्किल टिपण्णी करत दोन शब्दातच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याची संधीही साधली. 'हे खरे बोलतात, यांना मोदींसारखे खोटे बालता येत नाही', असा टोला लगावत थोरांतांनी मोदींपेक्षा यांच्यावरच जास्त विश्वास असल्याचे दर्शवले. यामुळे आता भाजप-काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

सध्या महाराष्ट्रात विधिमंडळाचे अधिवेशन गाजत आहे. सत्ताधारी-विरोधकांतील संघर्षाने तेथील वातावरण तापत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर म्हणजे, पुण्यात येत आहेत. मोदींच्या दौऱ्यामुळेच सोमवारी, मंगळवारी अधिवेशनाचे कामकाज बंद ठेवल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.

अशातच विधानभवनाच्या आवारात मोदींसारखी दिसणारे विकास महंत आले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांच्या हातात हात दिला. दरम्यान, त्यांच्याभोवती लोकांसह माध्यमप्रतिनिधींनीही गलका घातला होता. नेमकी ही अचूक वेळ साधत थोरातांनीही भाजपसह मोदींवर बोचरी टीका केली.

मंहतांच्या हातात हात देत थोरात म्हणाले, "हे फक्त मोदींसारखे दिसतात, यांना खोटे बोलता येत नाही." कुणाच्या मनी-ध्यानी नसताना थोरांतांनी साधलेल्या 'टायमिंग'ने तेथील लोकांमधील एकालाही हसू आवरता आले नाही.

दरम्यान, विधिमंडळात काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यात थोरांतासह नाना पटोले, अशोक चव्हाण आदी नेते आघाडीवर आहेत. भाजपही त्यांना जशास तसे उत्तर देताना दिसत आहे. आता थोरांतांनी मोदींवर केलेल्या टिपण्णीमुळे भाजप काय भूमिका घेणार हे पहावे लागेल.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT