Narendra Modi News :
Narendra Modi News :  Sarkarnama
मुंबई

Narendra Modi News : मोदींच्या आगमनापूर्वीच बीकेसीमधली कमान कोसळली!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भात आता मुंबईतून एक बातमी समोर येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा होत आहे. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामाचं उद्घाटन आज पार पडणार आहे, तसेच संध्याकाळी मोदींची वांद्रे-कुर्ला संकुल येथे मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोदींच्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. बीकेसी मैदानात भव्य असे सजावट करण्यात आले आहे. मात्र या मैदानातील एक कमान कोसळून पडल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. आता पोलीस आणि कार्यकर्त्यांकडून हे कमान बाजूला करण्याचं काम होत आहे.

आज मुंबईच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामं व लोकार्पणाचं कार्यक्रम होणार आहे. यानंतर आज मोदी बीकेसी मैदानात सभा घेणार आहेत. सभेच्या ठिकाणी आता हळूहळू भाजप कार्यकर्ते आणि लोक गर्दी करत आहेत. मोदींना पाहण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी लोक या ठिकाणी जमत आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मुंबईतील विकासकामांचा उद्घाटन करून भाजप या कामांचं श्रेय घेतेय, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हंटले होते की, मुंबईतील विकास कामांची पायाभरणी शिवसेनेने केली, त्याचे श्रेय भाजपला घेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT