Shrirang Barne, Eknath Shinde, Prataprao Jadhav Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : बारणे की जाधव..? खासदारकीचं मैदान मारलेले शिंदेंचे शिलेदार आता मंत्रि‍पदासाठी झुंजणार!

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि केंद्रात भाजपला मित्र पक्षांच्या साथीने सरकार स्थापनेची संधी मिळाली. जादुई आकडा गाठता आला नसल्याने भाजपला आता मित्रा पक्षांनाही मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावे लागणार आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका शिलेदाराला केंद्रात मानाचे पान मिळणार आहे. त्यासाठी शिवसेनेतील मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

मावळातून बारणेंनी Shrirang Barne हॅटट्रीक तर बुलढाण्यातून जाधवांनी खासदारकीचा चौकार मारला आहे. त्यामुळे यातील कुणाची केंद्रातील मंत्रिमंडळात वर्णी लागणार, याकडे राज्याचे लक्ष आहे. मात्र बारणे की जाधव यांच्यात निवड करतानाही मुख्यमंत्री शिंदेंची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे. याबाबत ते काय निर्णय घेणार, याचीही उत्सुकता लागली आहे.

लोकसभेचा निकाल लागताच भाजपप्रणित एनडीएला 292 तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. त्यासाठी रविवारी पंतप्रधान पदासह कॅबिनेट मंत्र्याचा शपथविधी होणार आहे. तर भविष्यात शिवसेनेलाही एक मंत्रिपद मिळेल, असे अश्वासन देण्यात आले आहे.

या मंत्रि‍पदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव Prataprao Jadhav आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात रस्सीखेच असणार आहे. जाधवांनी 3 लाख 49 हजार 867 मते मिळवत 29 हजार 479 मतांनी विजय खेचून आणला. तर बारणेंनी 6 लाख 92 हजार 832 मते घेत 96 हजार 615 मतांनी विजय संपादन केला आहे. त्यामळे केंद्रातील मंत्रि‍पदासाठी मुख्यमंत्री शिंदे कुणाला निवडणार याचीच चर्चा आतापासून सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT