PM Modi's Advertising Expenditure
PM Modi's Advertising Expenditure Sarkarnama
मुंबई

PM Modi's Advertising Expenditure: पंतप्रधानांचा स्वत:च्या जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च? ठाकरे गटाच्या नेत्याने थेट आकडेवारीच जाहीर केली, पाहा व्हिडीओ...

सरकारनामा ब्युरो

PM Narendra Modi news | राज्यात दिवसेंदिवस भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष शिगेला पोहचत आहे. ठाकरे गटाने सुरु केलेल्या महाप्रबोधन यात्रेतून राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील भाजप (BJP) सरकारविरोधातील धार अधिकाधिक तीव्र होत चालली आहे.महाप्रबोधन यात्रेतून ठाकरे गटाच्या उपनेत्या एकापाठोपाठ एक शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर टिका करताना दिसत आहेत. (Narendra Modi spent more than 700 crores on his advertisements)

अशातच शनिवारी सुषमा अंधारे यांनी खोपोलीत झालेल्या सभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला आहे. अंधारेंनी गेल्या २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त स्वत:च्या जाहिरातींवर केलेल्या खर्चाची आकडेवारीच प्रसिद्ध केली आहे. गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधानांनी स्वत:च्या जाहिरातीवर तब्बल सातशे कोटींहून अधिक खर्च केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. (PM Narendra Modi News)

"पंतप्रधान मोदी खुप गोड बोलतात पण लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. मी तुमच्या समोर एक आकडेवारी सादर करते. ही आकडेवारी मी काढलेली नाही. ही कॅग ची आकडेवारी आहे. कॅंग देशाचा लेखा परिक्षण अहवाल तयार करते. कॅग देशाचा हिशोब मांडते . कॅग कशावर किती खर्च झाला हा हिशोब मांडते. कॅगने हा हिशोब लोकसभेत सादर केलेला हिशोब आहे. मोदींजींना स्वत:च्या जाहिरातीवर किती खर्च केला याची ही आकडेवारी आहे." (Mahavikas Aghadi news)

2014-15 या काळात 437.67 कोटी, 2015-16 या काळात 531 कोटी रुपये,2016-17 या काळात 609 कोटी रुपये मोदींजींनी फक्त स्वत;च्या जाहिरातींवर खर्च केले आहेत. २०१७-१८ या काळात 468 कोटी रुपये, 2018-19 या काळात 514 कोटी रुपये, 2019-20 या काळात 317 कोटी रुपये, 2020-21 या काळात 167 कोटी रुपये तर 2021-22 या काळात 101 कोटी, तर 2022-23 या काळात 76 कोटी रुपये फक्त स्वत:च्या जाहिरातीसाठी खर्च केले. नऊ नऊ लाखाचे सुट घालून 'साला मै तो बन ठन के साब बन गया' हे साहाब का खर्चा देखिये. अशी टिकाही सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या काळात, केंद्रात भाजपचे सरकार असतानाच्या काळात कॅगने ही आकडेवारी लोकभेत सादर केली आहे. हा खर्च सातशे कोटीहून अधिक आहे. याचा अर्थ तुमच्या माझ्या सारख्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व फी या खर्चातून निघाली असती, असही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

Edited By - Anuradha Dhawade

पाहा व्हिडीओ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT