Narendra Patil News : Eknath Shinnde
Narendra Patil News : Eknath Shinnde  Saerkarnama
मुंबई

Narendra Patil News : दंड थोपटत नरेंद्र पाटलांनी आपल्याच सरकारला नमवलं!

सरकारनामा ब्यूरो

Narendra Patil News : य़ेत्या २७ फेब्रुवारीपर्यंत माथाडी कामगारांचे विविध मागण्या पूर्ण न केल्यास, अधिवेशनादरम्यान विधानभवनावर कामगारांना घेऊन धडकणार असल्याचा सज्जड इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटलांनी (Narendra Patil) आपल्याच सरकारला दिला होता. आता त्यांच्या या मागण्यांची शिंदे फडणवीस सरकारने दखल घेतली आहे. यामुळे नरेंद्र पाटील यांनी आपल्याच सरकारला नमवल्याची चर्चा आहे.

माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री,उद्योग मंत्री, संबंधित सचिव, कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड अधिकारी, युनियन प्रतिनिधी या सर्वांची संयुक्त बैठक घेऊन नरेंद्र पाटलांच्या व कामगारांच्या सर्व मागण्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आमचे एक दिवसीय लाक्षणिक संप यशस्वी झाला असून,आतां कामगारांची कामे सुरळीत चालू रहातील,अशी माहीती माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना पाटील यांच्यासोबत शिष्टमंडळात युनियनचे पदाधिकारी,व्यापारी असोसिएशचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

काय आहेत मागणया ?

*माथाडी बोर्डात माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्यांने नोकऱ्या देण्यात द्याव्यात.

*माथाडी कामगार, त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीबाबत सल्लागार समितीची पुर्नरचना करण्यात यावे.

*पुर्नरचना झालेल्या सल्लागार समितीमध्ये कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून निर्वाचन करण्यात यावे.

*सुरक्षारक्षक विषयी कामगार सल्लागार समितीची पुर्नस्थापना करणे.

*माथाडी मंडळ पुनर्रचना करण्यात आल्यानंतर, या मंडळांवर युनियन संदर्भात सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे.

*कामगारांच्या हक्काच्या कामांमध्ये अडथळा आणत कामगारांवर दहशत करणाऱ्या गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तींना आळा घालणे. पोलीस संरक्षण देणे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT