Naresh Mhaske Sarkarnama
मुंबई

Naresh Mhaske News : मनोज भाऊ, सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे!

Naresh Mhaske Viral Tweet : नरेश मस्केंनी ट्विट करत सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. यावर ट्विट करत म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Pankaj Rodekar

Thane Maratha Reservation : शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे तुझे सूत्रधार आहेत असा आरोप करत तू तुतारीच्या तालावर नाचू नकोस. 'तसेच काय रे मनोज भाऊ, तुला नक्की काय हवं आहे. सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे' असा सवाल उपस्थित करत कुणाच्या तरी हातचं, बाहुलं होऊ नकोस, असे भावनिक आवाहन ही म्हस्के यांनी केले आहे.

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. यावर ट्विट करत म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं ना रे, मराठा आरक्षण. तुम्हाला मग आता कसली मळमळ, कसला त्रागा तुला' असा प्रश्न उपस्थित केला. याशिवाय म्हस्के यांनी 'मी पण एक मराठाच आहे. आरक्षणाचं महत्व जाणतो, तू मात्र हल्ली समाज सोडून त्यात राजकारण आणतो.' अशा शब्दात मनोज जरांगेंना चांगलच सुनावलं.

  • काय रे भाऊ, तुला नक्की काय हवं आहे..

    सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे?

  • एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं ना रे

    मराठा आरक्षण तुम्हाला

    मग आता कसली मळमळ, कसला त्रागा तुला?

  • मी पण एक मराठाच आहे

    आरक्षणाचं महत्व जाणतो

    तू मात्र हल्ली समाज सोडून त्यात राजकारण आणतो

  • लोक म्हणतात रोहित पवार- राजेश टोपे तुझे सूत्रधार

    लाखो मराठ्यांच्या विश्वासाला तू घातलास लबाडीचा हार

  • आज जो आहेस ते लोकांच्यामुळे आहेस तू

    मराठ्यांच्या आंदोलनाचा सामान्यातला चेहरा तू

  • समाजासाठी उभा राहिलास, त्यांच्यासाठीच लढ

    तुतारीच्या तालावर नाचलास तर उन्मळेल विश्वासाचा वड

  • राजकारण करून आंदोलनाचा विस्कोट करू नकोस

    कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव

    कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस

तर लोक म्हणतात ''रोहित पवार- राजेश टोपे तुझे सूत्रधार आहेत. पण, लाखो मराठ्यांच्या विश्वासाला तू घातलास लबाडीचा हार असे नमूद करून म्हस्के यांनी आज जो आहेस, ते लोकांच्यामुळे आहेस. हे विसरून नको. तू मराठ्यांच्या आंदोलनाचा सामान्यातला चेहरा तू समाजासाठी उभा राहिलास, त्यांच्यासाठीच लढ तुतारीच्या तालावर नाचलास तर उन्मळेल विश्वासाचा वड राजकारण करून आंदोलनाचा विस्कोट करू नकोस. कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस.' असे म्हस्के यांनी नमूद केले आहे.

Edited By : Rashmi Mane

SCROLL FOR NEXT