Mumbai banking sector controversy : नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणाची चर्चा अजूनही सुरू असतानाच, आता मुंबईत देशातील एका अग्रगण्य बँकेच्या शाखेतून अशाच स्वरूपाचे धक्कादायक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाने राजस्थान पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पत्नीला धर्मांतरासाठी भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात अद्याप मुंबई पोलिसांकडून (Police) कोणतीही अधिकृत चौकशी झालेली नाही. तक्रारदार तरुणाने संबंधित बँकेच्या उपमहाव्यवस्थापकांना पत्र लिहून पत्नीची तातडीने राजस्थानमधील गावी बदली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
पत्नी मुंबईत (Mumbai) असलेल्या बँक शाखेत कार्यरत असून, तिच्या सहकाऱ्याने प्रेमसंबंधांच्या माध्यमातून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. पतीच्या दाव्यानुसार, काही महिन्यांपूर्वी पत्नीने संबंधित सहकाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले होते.
यानंतर पत्नीच्या वागण्यात मोठा बदल जाणवू लागला. तिने दुसऱ्या धर्माच्या चालीरीती स्वीकारण्यास सुरवात केली, धार्मिक ग्रंथांचे वाचन सुरू केले आणि पेहरावातही बदल झाला. इतकेच नव्हे, तर आठ वर्षांच्या मुलीवरही त्याच प्रकारचे संस्कार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पतीने केला आहे.
या प्रकरणाची माहिती दोन्ही कुटुंबीयांना देण्यात आली होती. त्यानंतर चर्चा करण्यासाठी पत्नी आणि मुलीला मुंबईतून घेऊन राजस्थानमधील गावी गेलो असता, संबंधित व्यक्ती तिथे आला आणि पत्नी व मुलीला सोबत घेऊन गेल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. याचबरोबर, पत्नीला याआधी आणखी एका व्यक्तीने कर्ज घेण्यास भाग पाडले आणि ती रक्कम हडप केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पत्नीला प्रेमसंबंधात अडकवणारी आणि तिच्या नावावर कर्ज काढणारी दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त करत, अन्य धर्मातील महिलांना फसवून धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्याची माहिती समोर आली असून, राजस्थान पोलिसांची टीम लवकरच मुंबईत चौकशीसाठी दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाशिकनंतर आता मुंबईतील हे कथित धर्मांतर प्रकरणही राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.