janardhana reddy sarkarnama
मुंबई

Karnataka News : भाजपमधील माजी मंत्र्याने केली नव्या पक्षाची घोषणा ; राजकीय समीकरण बदलणार

janardhana reddy announces new party : . 'कल्याण राज्य प्रगति पक्ष'असे जी जनार्दन रेड्डी यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे.

सरकारनामा ब्युरो

janardhana reddy announces new party : कर्नाटकमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण माजी मंत्री जी जनार्दन रेड्डी यांनी रविवारी नवीन पक्षाची स्थापना करीत प्रस्थापितांना येत्या निवडणुकीत आव्हान दिले आहे. 'कल्याण राज्य प्रगती पक्ष' असे जी जनार्दन रेड्डी यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे.

नव्या पक्षाची घोषणा करीत जी जनार्दन रेड्डी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या दोन दशकापासून ते भाजपसोबत होते. अवैध खणन प्रकरणात रेड्डी हे आरोपी आहेत. त्यांनी नव्या पक्षाची घोषणा करताना आपण कोप्पल जिल्ह्यातील गंगावती विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

मी भाजपचा सदस्य नसल्याचे काही भाजपचे नेते सांगत होते, ते आज सिद्ध झाले आहे. माझ्या विचाराचा पक्ष मी स्थापन केला आहे. धर्म आणि जातीवर आधारित राजकारण आम्ही करणार नाही. येत्या काही दिवसात आमच्या पक्षाची भूमिका आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यभर यात्रा करणार आहोत, असे त्यांनी सांगितलं.

गेली बारा वर्ष रेड्डी हे राजकारणापासून अलिप्त होते. २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोलाकलमुरु विधानसभा मतदार संघातील त्याचे मित्र, व सध्याचे मंत्री बी श्रीरामुलु यांचा प्रचार केला होता. तेव्हा त्यांना खणन गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. रेड्डी यांचा भाजपशी कोणताही संबध नसल्याचे निवडणुकीपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले होते.

त्यामुळे रेड्डी यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या बल्लारी जिल्ह्यात निवडणूक लढण्यास भाजपने विरोध केला होता. त्यांनी गंगावती येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. रेड्डी यांचे मोठे बंधू भाई करुणाकर रेड्डी हरपनहल्ली विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार आहेत. त्यांचे लहान भाऊ सोमशेखर रेड्डी हे बल्लारी ग्रामीण मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत रेड्डी हे चर्चेत आले होते. त्यांनी सुषमा स्वराज यांचा प्रचार केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT