Eknath Shinde Navi Mumbai Sarkarnama
मुंबई

BJP ShivsenaUBT alliance claim : उद्धवसेनेची भाजपला मदत? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता, महायुतीमधील समन्वय कोलमडलं!

Navi Mumbai BJP ShivsenaUBT Alliance Claim Creates Unrest in Eknath Shinde ShiveSena Mahayuti Politics : नवी मुंबईत महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष भाजपला छुपी मदत करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Pradeep Pendhare

Navi Mumbai Municipal Corporation politics : मुंबई आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्यानिमित्ताने सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी वेगवेगळे राजकीय प्रयोग करण्यात गुंतले आहेत. विशेष करून, महायुती आणि मविआमध्ये असलेल्या मित्रपक्षांचा एकमेकांवर यातून भरवशा राहिलेला दिसत नाही.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष नेमकी कोणती भूमिका घेईल, यावर सर्वाधिक महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना अन् भाजपचे लक्ष ठेवून आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेनेला शह देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना भाजपला साथ देणार असल्याची छुपी चर्चा रंगली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. यातून राजकीय धुसफूस सुरू झाली असून, महायुतीत समन्वय राहिला नसल्याची चर्चा रंगली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना सुरू आहेत. या प्रभाग रचनेवर संपूर्ण राज्यात सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व असल्याचे दिसते आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील (Navi Mumbai) प्रभाग रचनेत देखील सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व असल्याचे दिसते. नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व दिसते. त्यामुळे नवी मुंबईतील भाजप मंत्री गणेश नाईक आणि भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नवी मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) इच्छुक आहेत. यातून भाजप मंत्री गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत राजकीय संघर्ष उफाळला आहे. मंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथं बालेकिल्ल्यात भाजपने जनता दरबार घेतले. भाजपच्या या रणनीतीला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने देखील नवी मुंबईत जनता दरबार घेतले. शिंदे-नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष आता नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने अधिक उफळण्याची चिन्हं आहे.

शिंदे-नाईक यांच्या राजकीय संघर्षात नवी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना कोणती राजकीय भूमिका घेते याकडे लक्ष लागलं आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे नवी मुंबईत देखील मोठी ताकद आहे. प्रभाग रचनेवरून सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष भाजप मदत करत असल्याचा निरीक्षण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नोंदवलं आहे. यामुळे शिवसेना ठाकरे सेनेच्या या छुप्या भूमिकेमुळे शिंदे यांच्या शिवसेना पक्षात अस्वस्थता वाढली आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने पक्षाने ही चर्चा फेटाळून लावली. नवी मुंबईतील प्रभाग रचनेतील गोंधळावर आम्ही काही सूचना आणि हरकती घेतल्या आहेत. त्याचे निराकरण न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे संपर्क प्रमुख एम. के. मढवी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तयार असून, तसं सूक्ष्म नियोजनावर भर दिला जात आहे. परंतु, महायुतीमध्येच समन्वयाचा अभाव असल्याने अशा चर्चा घडवून आणल्या जात असल्याची टीका शिवसेना ठाकरे सेना पक्षाकडून करण्यात आली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या महाविकास आघाडीमध्ये उत्तम समन्वय आहे. मनसेसोबतही सकारात्मक चर्चा सुरू आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये तीव्र मतभेद सुरू आहेत, याकडेही संपर्क प्रमुख एम. के. मढवी यांनी लक्ष वेधले. जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, रंजना शिंत्रे यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची निवडणुकीसाठी बांधणी जवळपास पूर्ण होत आल्याचे सांगितले. जनतेच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत आहोत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य आहे. यातून सत्ताधारी विरोधकांमध्ये चलबिचल झाली आहे.

प्रभाग रचना चुकीची; भाजपचा आरडाओरडा

भाजपने देखील नवी मुंबईच्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला आहे. प्रभाग रचना चुकीची झाल्याचा दावा केला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाशी सुरात-सूर मिसळला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना ठाकरे सेन पक्षाची छुपी युतीच्या चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT