Ganesh Naik vs Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Navi Mumbai Politics : एकनाथ शिंदेंच्या मंत्रालयाचा गणेश नाईकांना दणका; देवेंद्र फडणवीसांकडे दाद मागणार!

Eknat Shinde Vs Ganesh Naik : नवी मुंबई महापालिकेने पाठवलेला पहिला प्रस्ताव एकनाथ शिंदें मंत्री असलेल्या नगरविकास विभागाने फेटाळला आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध नाईक वाद पुन्हा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Navi Mumbai News : नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी, सेवानिवृत्तीचा कर्मचाऱ्यांच्या कालावधी ५८ वरून ६० वर्षे करण्याचा प्रस्ताव पहिल्याच महासभेत सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला; मात्र महापालिकेने पाठवलेला हा प्रस्ताव एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या नगरविकास विभागाने फेटाळला आहे.

सहा वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर नवी मुंबई महापालिकेत निवडणुकीनंतर सभागृह अस्तित्वात आले. त्यानंतर पहिलीच महासभा २० फेब्रुवारीला झाली. या वेळी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्ती कालावधी ५८ वरून वाढवून ६० वर्षाचा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने फेटाळला आहे. त्यामुळे मंत्री गणेश नाईक आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दादा मागण्याची शक्यता आहे.

सरकारची पूर्वपरवानगी न घेता तसेच सेवा विनिमय विद्यमान कायदे व राज्य सरकारी नियमांशी विसंगत असल्याचा ठपका ठेवत नगरविकास विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत संबंधित ठराव प्रथमदर्शनी निलंबित केला आहे.

महासभेने पाठवलेला पहिलाच प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने अधिकारी आणि कर्मचारीवर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिकेतील ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी दोन वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत. महापालिका अनेक धोरणात्मक निर्णय घेताना कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या अनुभवाचा फायदा प्रशासनाला झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाना शहर नियोजनासाठी हातभार लागावा याकरिता त्यांचा सेवानिवृतीचा कार्यकार वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.

सभागृह नेत्यांची नाराजी

याबाबत पालिकेतील सभागृह नेते सागर नाईक यांनी खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत भेट घेऊन नवी मुंबई शहराच्या हिताच्या भूमिकेतून घेतलेल्या निर्णयाला मंजुरी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. आयुक्तांमार्फत पाठवलेला हा प्रस्ताव सरकारने फेटाळून एक प्रकारे शहर विकासाची पोकळी निर्माण केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT