ravi rana, navneet rana
ravi rana, navneet rana sarkarnama
मुंबई

राणा दांपत्याला उच्च न्यायालयाचा धक्का; याचिका फेटाळली

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी उच्च न्यायालयात (High Court) एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे राणा दांपत्याला मोठा धक्का बसला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' या खासगी निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेसह दोन समुदायामध्ये तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याने राजद्रोहाच्या कलमासोबत अन्य कलमाअंतर्गत राणा दांपत्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. याबाबत त्यांनी आज (ता. 25 एप्रिल) तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर नुकतीच सुनावणी झाली असून राणा दांपत्याची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे राणा दांपत्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

राणा दांपत्याचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी न्यायालयात केलेल्या युक्तीवादानुसार पोलिसांनी राणा दांपत्याला यांना १४९ (अ) सीआरपीसीची नोटीस बजावली होती. सोशल मिडियावर प्रक्षोभक भाषण करू नये, व्हिडिओ शेअर करू नये, असे ही बजावले होते. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोघानींही 'मातोश्री'वर जाणं टाळलं, या प्रकरणात पहिला गुन्हा 23 एप्रिलला नोंदवला तर दुसरा 24 एप्रिलला नोंदवला गेला. पोलिस ज्यावेळी पहिल्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेले त्यावेळी दांपत्यांनी पोलिसांशी गैरवर्न केले. त्यामुळे या दोन्ही घटना एकाच वेळी घडलेल्या आहेत. मात्र गुन्हे स्वतंत्र दाखल केले गेले. या दोन्ही गुन्ह्यांमधील वेळ हा वेगळा आहे. पहिल्या गुन्ह्यात 5.23 ला घडला. मात्र पोलिस 5.15 वाजचा अटक करण्यासाठी आले होते, असा युक्तिवाद मर्चंट यांनी केला. त्यामुळे ही कारवाई अयोग्य असून चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला.

सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या युक्तीवादानुसार दोन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत. पहिला गुन्हा 5.23 वाजता दाखल झाला तर दुसरा गुन्हा मध्यरात्री म्हणजेच 24 एप्रिल रोजी 2 वाजून 6 मिनिटांनी दाखल झाला. पोलिसांना दोघांनीही सहकार्य केले नाही. त्यामुळे पोलिसांना त्यांना कायद्याने समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राणा दांम्पत्याने पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला, असा युक्तीवाद केला.

यावर न्यायालयाकडून राजकीय व्यक्तींनी सार्वजनिक जिवनात असे वागणे किंवा वर्तन करणे चुकीचे असल्याचे म्हणत राणा दांपत्यावर ३५३ कलमांतर्गत नोंदवलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली. तर दुसऱ्या गुन्ह्यात कारवाई करायची असल्यास पोलिसांनी त्यांना ७२ तास आधी नोटीस द्यावी, असे म्हटले आहे. न्यायालाच्या या निकालामुळे राणा दांपत्याचा अडचणीत वाढ झाली असून त्यांचा तुरुंगातील मुक्काम मात्र वाढणार आहे.

दरम्यान, पोलिसांकडून राणा दांपत्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-अ खाली एफआयआर नोंदवला होता. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी बॉम्बे पोलीस कायद्याखालील कलमेही लावण्यात आली होती. त्यानंतर राजद्रोहाचे १२४-अ हे कलमही लावण्यात आले होते. त्यामुळे राणा दांपत्याच्या अडचणी वाढल्या. पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून त्यामुळे राजद्रोहाचे कलम लावण्यात आल्याने हे कलम रद्द करण्याचे आणि एफआयआरही रद्द करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावे, अशी विनंती राणा दांपत्याकडून याचिकेत करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT