Navneet Rana latest News 
Aaditya Thackeray
Navneet Rana latest News Aaditya Thackeray  Sarkarnama
मुंबई

Navneet Rana : '' छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून...''; नवनीत राणांनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच बिहार दौर्यावर गेले होते. या दौर्यात त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. मात्र, ठाकरेंच्या बिहार दौर्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर चांगलीच आगपाखड केली होती. आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील आदित्य ठाकरेंवर त्यांच्या बिहार दौऱ्यावरुन निशाणा साधला होता. (Navneet Rana latest News)

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या बिहार दौर्यासह उध्दव ठाकरेंच्या चिखली येथील भाषणावरही सडकून टीका केली. राणा म्हणाल्या, छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून दुसर्या राज्यात गेले होते. त्यांचा महाराष्ट्रातील लोकांवर विश्वास नाही का? महाराष्ट्राने आतापर्यंत कायमच इतरांना प्रेरणा दिली आहे. याचा विसर ठाकरेंना पडला का? आपल्या राज्यातील नेत्यांनी कधीही इतरांसमोर हात पसरला नाही अशा शब्दांत राणा यांनी ठाकरेंचा समाचार घेतला.

तसेच उद्धव ठाकरे हे फक्त टीका करण्यासाठी सभा घेतात. ते इतरांना म्हणतात रस्त्यावर उतरा, पण स्वत: ते कधी मातोश्री सोडून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत ? असा सवाल उपस्थित करत शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाहीतर, तुम्ही अडीच वर्षात नेमकं काय केलं याचं स्पष्टीकरण द्यायला हवं असा हल्लाबोलही राणा यांनी केला.

उन्हाचे चटके कार्यकर्त्यांनाच न देता उध्दव ठाकरेंनी देखील रस्त्यावर उतरून लढाई केली पाहिजे असंही राणा यावेळी म्हणाल्या. तसेच तीन महिन्यात शेतकऱ्यांचा एकही प्रश्न उरलेला नाही आहे. 100 पेक्षा जास्त निर्णय या सरकारने घेतले आहेत असेही राणा यावेळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT