Navneet rana | Ravi Rana| 
मुंबई

ठाकरेंना पुन्हा आव्हान देणं राणांना महागात पडणार? सरकारी वकीलांनी स्पष्टचं सांगितलं...

Navneet rana | Ravi Rana|Bail| न्यायालयाने जामीन देताना राणा दांपत्याला तीन महत्त्वाच्या अटी घातल्या होत्या.

सरकारनामा ब्युरो

Rana's Bail will be canceled?

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) अमरावतीच्या खासदार नवनीत (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना काही अटी शर्तींवर जामीन दिला होता. आता नवनीत राणांनी या अटी शर्तींचे पालन केले की नाही. यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Navneet Rana, Ravi Rana's bail will be canceled?)

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने जामीन देताना राणा दांपत्याला तीन महत्त्वाच्या अटी घातल्या होत्या. राणा दांपत्याला माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र रविवारी लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच नवनीत राणांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

यानंतर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीदेखील राणा दाम्पत्यानं न्यायालयाने घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याच्या वक्तव्यांची तपासणी केली जाणार आहे. जर त्यांच्या संभाषणात आक्षेपार्ह काही बाबी आणि वक्तव्ये आढळली, तर त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी न्यायालयात करण्यात येईल, अशी माहिती प्रदीप घरत यांनी दिली आहे.

राणा दांपत्याला जामीन देताना अट

न्यायालयाने राणाम दांपत्याला जामीन देताना मांध्यमांशी संवाद साधू नये अशी अट घातली होती. पण सुटका होताच राणा दांपत्याने माध्यमांशी संवाद साधला. रविवारी रवी राणा आणि नवनीत राणा दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला. आता राणा दांपत्याने माध्यमशी संवाद साधताना न्यायालयाच्या अटीशर्थींचे उल्लंघन केलंय का याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस आणि सरकारी वकील त्यांच्या मुलाखती आणि वक्तव्य तपासत आहेत. जर न्यायालयाच्या अटी शर्थीचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास सोमवारी मुंबई पोलीस सत्र न्यायालयात राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जामीन देताना राणा दाम्पत्याला, कायदा आणि सुव्यवस्थेला वेठीस धरु नये, पोलिसांना तपासात सहकार्य करावे आणि पुराव्यांंशी कोणत्याही प्रकारची छेडछा करु नये. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया किंवा मुलाखती देवू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच या अटी आणि शर्तींचे पालन न केल्यास हा जामीन रद्द देखील होवू शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT