Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama
मुंबई

'गंगाने बुलाया है,' असे म्हणणाऱ्या मोदींना मलिक म्हणाले, गंगा कधी स्वच्छ होणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशांचे पंतप्रधान आहेत. त्यांचं ते निवडणुकीचं क्षेत्र आहे. प्रश्न असा आहे की साडेसात झाले आहेत. त्यावेळी बोलले होते गंगाने बुलाया है। परंतु अजूनपर्यंत गंगा नदी स्वच्छ झालेली नाही. काशीच्या बाबतीत देखील आश्वासन देण्यात आलं होते मात्र त्याठिकाणी देखील काहीच झालं नाही. आगामी निवडणुकीत कमीत कमी ते ४ ठिकाणी हरणार आहेत. पावसाळ्यात संपूर्ण काशीमध्ये गुडघाभर पाणी भरतं. ज्याठिकाणी ते (Narendra Modi)निवडणूक लढतात त्याठिकाणी आणि आजूबाजूच्या चार जागाही निवडुन येणार नाहीत,'' असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोदींना लगावला.

''भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांच्यात किती माणुसकी आहे, याबाबत मी काय बोलणार, कृपाशंकर सिह यांना इतिहास बघावा लागेल. जेव्हा संघ निर्माण झाला आहे. तेव्हापासून त्यांची भुमिका बदलली आहे,'' असे सांगून मलिक म्हणाले की माझा न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. मला न्यायालयाचा आदेश प्राप्त झालेला नाही. ज्यावेळी कोर्टाचे आदेश मिळतील. त्यावेळी आम्ही पुढची प्रक्रिया पार पाडू.''

''पंतप्रधान कोण होतील हा विषय चर्चेला नाही. सामूहिक नेतृत्वाखाली आपण एकजूट होऊ या अशी तयारी सुरू आहे. काही लोकं म्हणतात की टीएमसी तुमचा आमदार फोडत आहेत. जे आमदार टीएमसीमध्ये गेले आहेत. ते पाच वर्षापूर्वी आमच्या पक्षात गेले होते की, त्यांची मागणी होती की त्यांच्यासह त्यांच्या मुलीला देखील तिकीट मिळायला हवी. परंतु गोव्यात आमची काँग्रेस सोबत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं असावं की त्यांना दोन तिकीट मिळणार नाहीत,'' असे मलिक म्हणाले.

''निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर जे ठरवतील तेच होईल असं नाही. देशात 2014 मध्ये युपीएच्या विरोधात जसं वातावरण तयार करण्यात आलं होतं तसाच प्रयत्न सुरू आहे,'' असे मलिक यांनी स्पष्ट केलं. एसटी संपकऱ्यांचा न्यायालयात लढा देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मलिक यांनी यावेळी टीका केली. मलिक म्हणाले की, एसटीचा संप जे वकील पुढे नेत आहेत त्यांना भाजप चालवत आहे. याच वकिलांना घेऊन भाजपने मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण रोखले, त्यांना घेऊन माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांच्याविरोधात कारवाई केली. आता एसटीच्या कामगारांची ते दिशाभूल करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT