Nawab Malik Sarkarnama
मुंबई

होटल द ललित में छुपे है कई राज़...! मलिक रविवारी उडवणार बार

मलिकांनी नुकताच एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्ट्यांचा मुद्दा उपस्थित करून फडणवीसांवर निशाणा साधला होता.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी बुधवारी पुन्हा एकदा दोन ट्विटमधून सूचक इशारा दिला आहे. हा इशारा नेमका भाजपसाठी की एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासाठी आहे, हे स्पष्ट केलेले नाही. त्यासाठी त्यांनी येत्या रविवारचा मुहूर्त काढला असून हॉटेल द ललितपासून बार उडवणार असल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर (Aryan Khan Drugs Case) नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अडकवण्यात आले आहे, समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन नोकरी मिळवली, वानखेडे यांनी स्वत: ची आर्मी तयार करुन खोट्या केसेस दाखल करुन बॉलीवूड कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवले असे एक ना अनेक आरोप मलिकांनी केले आहेत. वानखेडे यांचे कपडे, शूज, घड्याळे लाखो रुपयांची असतात, असा दावाही त्यांनी केला आहे.

एवढ्यावरच न थांबता मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही केला. त्यामुळे त्यावर फडणवीस यांनीही मलिकांना थेट इशारा दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी विरूध्द भाजप असा सामना रंगला आहे. त्यातच मलिक यांनी बुधवारी दोन ट्विट करून सूचक इशारा दिला आहे. पहिल्या ट्विट मध्ये त्यांनी 'बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे', असं म्हटलं आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत 'होटल द ललित में छुपे है कई राज़...मिलते है रविवार को', असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं होतं, मलिकांचा नेमका रोख कुणाकडे आहे, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहे. दोन दिवसांपूर्वी मलिकांनी फडणवीस यांच्या भावाचा उल्लेख करत एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्ट्यांचा मुद्दा उपस्थित केला होता.

दरम्यान, एकीकडे नबाव मलिक सातत्याने समीर वानखेडेंवर आरोप करत असताना दूसरीकडे भाजप कडून समीर वानखेडे यांना समर्थन दिले जात आहे. समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ भाजप नेतेही नबाव मलिकांच्या आरोपांना उत्तर देत आहेत. वानखेडे यांनी जानेवारी 2021 मध्ये मलिक यांच्या जावयावर कारवाई केली होती. या कारवाईत ते 8-9 महिने तुरुंगात होते. याच सूडबुध्दीने मलिक सातत्याने वानखेडे यांच्यावर आरोप करत असल्याचे भाजप नेते म्हणत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT