Nawab Malik ED  Sarkarnama
मुंबई

नवाब मलिकांच्या प्रकृतीत बिघाड! ४ तासांपासून जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु

Nawab Malik | Arrested | ED | Custody : डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील ४ तासांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या बऱ्याच तपासण्या झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. ईडीच्या कोठडीत असताना त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

नवाब मलिक यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना काही वेळात पुन्हा कोठडीत हलवणे अपेक्षित होते. मात्र उपचारादरम्यान त्रास आणखी वाढल्याने डॉक्टरांनी त्यांच्या उर्वरित चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रुग्णालयात त्यांच्या उर्वरित चाचण्या सुरू असून उपचारही पार पडत आहेत. यासंदर्भात ईपीआर जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. यापूर्वीच न्यायालयाने नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत घरचे जेवण, आणि औषध बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांना ईडीने २३ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ईडीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे थेट आणि कमी पैशात जमिनीचे व्यवहार झाले होते. याच बाबतचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने कोठडी घेण्यापूर्वी मलिक यांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यानंतर त्यांना कारागृहात नेण्यात आले होते. मात्र आज त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT