Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama
मुंबई

Nawab Malik : नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, दिलासा मिळणार की कोठडी?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज त्यांनी जामीन मंजूर होणार की पुन्हा कोठडीत रवानगी होणार याचा निर्णय होणार आहे. प्रकृतीच्या कारणामुळे मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यात इस्पितळात उपचार होत आहेत. याआधीही मलिकांचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला होता. मात्र आजच्या सुनावणीत त्यांना दिलासा मिळतो की, त्यांना पुन्हा कोठडी दिली जाते, याचा निर्णय होणार आहे.

सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने मलिकांना मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक केली होती. गोवावाला कंपाऊंड जमीन खरेदीमध्ये मनी लॉड्रिंग केल्याचा आरोप आहे. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करत, दहशतवादाला आर्थिक पाठबळ दिल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. यावर आता काय निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवाब मलिक यांच्यावर आरोप काय?

गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी कटरचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या संबंधित महिलेने 1999 या वर्षी मध्ये सलीम पटेल या व्यक्तिच्या नावे पॉवर ऑफ एटर्नी तयार केली होती. यानंतर पटेल याने पॉवर ऑफ एटर्नी गैरवापर करत हसीना पारकरच्या सांगण्याप्रमाणे गोवावाला कंपाउंडची जमीन नवाब मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विक्री केल्याचा आरोप आहे.

नवाब मलिकांनी हे आरोप फेटाळले आहेत. जमीन खरेदी ही कायेदेशीर व सर्व नियमांचे पालन करत केल्याचा दावा मलिकांनी केला आहे. तपासाला पाच महिने होऊन गेले तरीही आरोपाबाबत सबळ पुरावे समोर आणले नसल्याचे मलिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला नाही. यामुळे आज काय निर्णय येतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT