Ajit Pawar, Nawab Malik sarkarnama
मुंबई

Nawab Malik News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची 'देवगिरी' खलबतं; बैठकीला नवाब मलिकांचीही हजेरी

NCP Ajit Pawar Party : नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाला राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी हजेरी लावली होती. त्यांनी त्यावेळी अजित पवार गटाच्या नेत्यांची भेटही घेतली होती. त्यामुळे विरोधकांनी महायुतीला चांगलंच घेरलं होतं.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्रात एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे.यात आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देत 12 वा उमेदवार उभा केला आहे.त्यामुळे आता फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.वैद्यकीय कारणास्तव जामिनावर बाहेर असलेल्या माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अजित पवार गटाच्या आमदारांच्या बैठकीला हजेरी लावली आहे.त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली 'देवगिरी' या निवासस्थानी होत आहे.या बैठकीला माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावली आहे.

इतके दिवस तटस्थ राहिलेले मलिक अजितदादा गटाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.त्यांचा महायुतीला पाठिंबा का?अशी चर्चा राजकीय गोटात जोर धरू लागली आहे.

नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाला राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी हजेरी लावली होती. त्यांनी त्यावेळी अजित पवार गटाच्या नेत्यांची भेटही घेतली होती.त्यामुळे विरोधकांनी महायुतीला चांगलंच घेरलं होतं.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चक्क अजित पवारांना पत्र लिहित मलिकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह महायुतीतील एन्ट्रीला विरोध दर्शवला होता.त्यावर प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा आमदार नवाब मलिक यांच्याशी कुठलाही संबंध नाही. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्येही त्यांच्या नावाचा आणि प्रतिज्ञापत्राचा समावेश नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT